आता ११ जानेवारीपर्यंत करता येणार “महाडीबीटी” वर अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन | शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे सर्व योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने ‘महाडीबीटी’ पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. या पोर्टलद्वारे शेतकरी त्यांच्या पसंतीच्या बाबींची निवड करू शकतात. आणि शेतीसंदर्भातील विविध बाबींसाठीच या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. mahadbtmahait.gov.in हे या पोर्टलचे संकेतस्थळ आहे. मोबाईल, संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदि माध्यमातून शेतकरी या संकेतस्थळावर जावून अर्ज करू शकतात. याची मुदत आता ११ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर अशी होती. मी आता ११ जानेवारी २०२१ करण्यात आली आहे. ज्यांनी याआधी अर्ज केला आहे. त्यांनी पुन्हा आपली माहिती सादर करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. पण शेतकऱ्यांना आपल्या लाभाच्या घटकांमध्ये बदल करता येवू शकणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवरून अर्ज करू शकतात. यासाठी वैयक्तिक नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना आधार क्रमांक देणे गरजेचे आहे.

या पोर्टलवर सादर झालेल्या अर्जांची पूर्वसंमती देणे, मोका तपासणी याबरोबर अर्जांची ऑनलाईन लॉटरी हे सर्व ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. या पोर्टल मुळे शेतकऱ्यांना आपला वेळ वाचविता येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!