महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कडून शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ मानद पदवी प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते शरद पवार यांना गौरवण्यात आहे. याबाबतची माहिती शरद पवार यांनी फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे.

https://www.facebook.com/238463949663921/posts/1883353561841610/

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत सामारंभादरम्यान डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने पवार यांना सन्मानित केल्याबद्दल पवार यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी पुढे लिहले आहे की, ” कृषी हा माझा आवडीचा व अभ्यासाचा विषय असून त्यात सखोल ज्ञान प्राप्त करण्याचा माझा प्रयत्न राहिला. त्या अभ्यासाचा हा गौरव आहे असे मी मानतो. कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो” . अशा भावना शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून व्यक्त केल्या आहेत.

या पदवीदान समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Comment

error: Content is protected !!