ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा ! अतिरिक्त ऊस गाळपासाठी मिळणार वाहतूक व साखर घट उतारा अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी ऊस हंगाम चांगलाच लांबला. राज्यात चांगला पाऊस झाल्याने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. एवढेच नाही तर मराठवाड्यात देखील उसाचे यशस्वी उत्पादन घेतले गेले. मात्र उत्पादन जास्त झाल्याने अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार कडून दिलासा मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय दिनांक २८ एप्रिल रोजी मुख्यमन्त्राची उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

200 रुपयांचे अनुदान कोणासाठी ?

— ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
–रिकव्हरी रेट जिथे १० टक्क्यांच्या खाली असेल तिथले ऊस उत्पादक यासाठी प्रयत्न असणार आहेत.
–ऊस वाहतूक ५० किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर प्रती किलोमीटर ५ रुपयांचं अनुदानसुद्धा राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे.
–गळीत हंगाम 2021-2022 मधील अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
–या निर्णयाप्रमाणे 1 मे 2022 पासुन गाळप होणाऱ्या व साखर आयुक्तालयाने अनिवार्य वितरित केलेल्या ऊसासाठी 50 किमी अंतर वगळून वाहतूक खर्च प्रति टन प्रति किमी दर 5 रुपयांप्रमाणे मंजूर करण्यात आला आहे.

तसेच ज्या सहकारी व खाजगी (शासन निर्णय 21 ऑक्टोबर 2011 ला एकवेळचा अपवाद म्हणून) साखर कारखान्यांच्या (इथेनॉलसाठी बी हेवी मोलॅसेस/ ऊसाचा रस वर्ग केलेला विचारात घेतल्यानंतर) प्रमाणित केलेल्या साखर उताऱ्यामध्ये 0.5 (अर्धा) टक्के किंवा त्यापेक्षा जास्त घट आल्यास व अंतिम साखर उतारा 10 टक्के पेक्षा कमी आल्यास सरसकट सर्व कारखान्यांना प्रति टन 200 रुपये दराने 1 मे 2022 नंतर गाळप होणाऱ्या सर्व ऊसासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!