… तर कारखानदार ,उद्योजक ,पेट्रोल कंपनीवाले, राजकीय मित्र आत्महत्या करतील ; गडकरींच्या विधानावरून राजू शेट्टींची पोस्ट चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिरिक्त उसाच्या बाबतीत एक विधान केले होते. उसाचे उत्पादन असेच वाढत गेले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल असे ते म्हणाले होते. यंदाच्या वर्षी उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचाच फटका बसला आहे त्यावरून त्यांनी हे विधान केले होते.त्यांच्या विधानावर प्रतिप्रश्न करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे राजू शेट्टी यांची पोस्ट ?

व्वा ! गडकरी साहेब… एफ . आर. पी. पेक्षा जास्त रक्कम दिली तर साखर कारखानदार आत्महत्या करतील…
शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील उसापासून इथेनॉल तयार करायला परवानगी दिली तरीही साखर कारखानदार आत्महत्या करतील…
शेतकऱ्यांना शेतातील उसापासून स्वतः इथेनॉल तयार करून ट्रॅक्टर साठी वापरलं तर पेट्रोलियम कंपनीवाले आत्महत्या करतील…
पाकिस्तानातील साखर आयात थांबवली तर तुमचे उद्योजक मित्र आत्महत्या करतील…
आजारी पडलेला सहकारी साखर कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात दिला तर तुमचे राजकीय मित्र आत्महत्या करतील…
यापेक्षा ऊसउत्पादकांना आत्महत्या केलेली केव्हाही चांगली नाही का?

अशा आशयाची पोस्ट करीत राजू शेट्टी यांनी नितीन गडकरींना केलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

काय आहे गडकरींचे विधान

उसाचे क्षेत्र असेच वाढत गेले तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल, ऊस हे शाश्‍वत पीक असले तरी शेतकऱ्यांनी इतर पिकांचा हे आधार घेणे गरजेचे आहे तसेच उसाच्या सिरप पासून इथेनॉल निर्मिती केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे आता पर्यायच उरणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी पुढे बोलताना गडकरी म्हणाले होते यंदा साखरेचे उत्पादन सर्वाधिक भारत देशामध्ये झाले आहे. दुसरीकडे ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन घटले आहे त्यामुळे भारतातील साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अधिक मागणी आहे उसाचे वाढीचे क्षेत्र हे धोक्यातच राहणार आहे. असे उत्पादन वाढत गेले तर ऊस उत्पादकांना देखील आत्महत्या करण्याची वेळ येईल असं नितिन गडकरी यांनी सुनावले आहे. आता पीक पद्धतीमध्ये बदल करून उत्पादन वाढवता येणे शक्य असल्याचही त्यांनी सांगितलं.

मात्र उसावर प्रक्रिया करून इथेनॉलची निर्मिती केली तर त्याचा अधिक फायदा होणार आहे त्यामुळे मागणीनुसार उत्पादन बदल करण्याची ही चांगली संधी असून प्रत्येक कारखाना इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा सल्ला देखील नितीन गडकरी यांनी दिला. मात्र अतिरिक्त उसाची केवळ चिंता आहे पुढच्या वर्षी यापेक्षा बिकट अवस्था असेल असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!