सणासुदीच्या काळात झेंडू ,गुलाब, शेवंतीला चांगलीच डिमांड ; भाव झाले दुप्पट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत त्यामुळे फुले, फळे यांना चांगली मागणी होत आहे. नवरात्र उत्सवास सुरुवात झाल्यामुळे फळांना या काळात चांगली मागणी असते. त्यामुळे फुले आणि फळ मार्केटला तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. फुलांच्या दरात जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सणासुदीच्या काळात फुलांचे दर हा वाढतात आताच्या दराचा विचार करता हे दर निश्चितच दुप्पट असल्याचे आपण म्हणू शकतो. पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या दर पत्रकानुसार मार्केट यार्डात झेंडूचा दर हा किलोमागे 5 ते 10 रुपये एक तारखेला होता मात्र त्याचा आजचा दर विचार केला तर आज सात तारखेला हा दर वाढवून किलोमागे 10 रुपये ते 40 रुपये इतका झाला आहे. तर एका गड्डी साठी गुलाबाचा दर हा 4 ते 6 रुपये होता मात्र आता तोच दर 10 रुपये ते 25 रुपये इतका झाला आहे. पांढरी आणि पिवळी शेवंती 40 ते 60 रुपये प्रति किलो आहे. तर त्याचा दर एक तारखेला प्रतिकिलो मागे केवळ 5 ते 15 रुपये इतका होता. गुलछडी चा दर हा 10 ते 30 रुपये प्रति किलो होता मात्र आज गुलछडी चा दर हा 80 ते 120 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. ऑर्किडच्या फुलांचा दर हा २०० ते ३०० रुपये होता तो आता वाढवून ३०० ते ४०० रुपये इतका झाला आहे. जरबेरा चा दर हा 10 ते 30 रुपये झाला आहे यापूर्वी हा दर 5 रुपये ते 10 रुपये इतका होता.

इतर भाजीपाला मार्केट दर

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कांदा किमान 800 ते कमाल 3200 रुपये, बटाटा 1000 किमान तर कमाल 1759, लसूण 2500 किमान तर 8500 कमाल , आले 800 तर कमाल 2700 रुपये, भेंडी किमान 2000 तर कमाल 3000 , गवार किमान 4000 तर कमाल 7000,टोमॅटो किमान 1000कमाल 2500, मटर किमान 8000 तर कमाल 13000, घेवडा कमाल 4000 तर किमान 2000, दोडका कमाल 3000 तर किमान 2000, हिरवी मिरची कमाल 2500 किमान 1200, दुधी भोपळा कमाल 2000 किमान 1000, काकडी कमाल 2000 किमान 600, कारली कमाल 2500 किमान 1400, डांगर कमाल 1400किमान 600, गाजर कमाल 2000 किमान 100 पापडी कमाल 3500 किमान 2500, फ्लॉवर कमाल 2500 किमान 1500 कोबी कमाल 1000 किमान 400, वांगी कमाल 4500 किमान एक हजार, ढोबळी मिरची कमाल 3500 किमान पंधराशे, सुरण कमाल 2500 किमान बाराशे, रुपये तोंडली कमाल 3000 किमान दोन हजार बीट कमाल 1500 किमान आठशे, कमाल 4000 किमान 2000 (सर्व दर प्रति क्विंटलचे आहेत )

Leave a Comment

error: Content is protected !!