राज्यात कमाल तापमानात घट, आज ‘या’ भागात पावसाची शक्यता ; पुणे हरवलं धुक्यात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसासोबतच हवेत कमालीचा गारठा वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचीही तारांबळ उडाली आहे. राज्यात कमाल तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. पुण्यात १६.३ एवढे कमाल तापमान नोंदवले गेले आहे.

पुण्यात दाट धुक्याचा अनुभव …

मागील दोन दिवसांपासून पुण्यात ऊन खूप कमी प्रमाणात आलं असून दाट धुक्याचा अनुभव आज सकाळी नागरिकांना आला आहे. अनेकजणांनाही सोशल माध्यमातून अशाप्रकारचे धुके पहिल्यांदाच पुण्यात अनुभवत असल्याचे सांगितले आहे. आज सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार पुण्यात आद्रतेचं प्रमाण ९६% नोंदले गेले आहे. दरम्यान “पुण्यात धुक्यामुळे दृश्यमानता कमी आहे. परिणामी पुढील काही तास उड्डाणे उशीर किंवा वळवल्या जातील . पुणे विमानतळावरून वरून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या एअरलाइन्सच्या फ्लाइटच्या वेळा तपासा” . अशा स्वरूपाच्या सूचना पुणे विमानतळाकडून जरी करण्यात आल्या. मात्र पुन्हा काही वेळानंतर दृश्यमानता सुधारल्याने विमान सेवा सुरु करण्यात आली.

ओडिसा आंध्रच्या किनाऱ्यावर चक्रीवादळाचा धोका

हवामान खात्याने ओडिसा आणि आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर चक्री वादळ धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील 12 तासांत CS मध्ये ते तीव्र होण्याची शक्यता आहे आणि उद्या सकाळपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश-दक्षिण ओडिशा किनार्‍यापासून पश्चिम-मध्य पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

आज या भागात पावसाची शक्यता

आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबईत, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा ,सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शितीपिकांवर परिणाम

ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला या पावसानं धडकीच भरलीये . सातारा शहर आणि महाबळेश्वरमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे स्ट्रॉबेरीचं पीक धोक्यात आलं. तिकडे कोकणातील रत्नागिरीतल्या चिपळूण, गुहागर, खेड, दापोलीतही सरी बरसल्यात. त्यामुळे आंबा पीक संकटात सापडलंय. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!