राज्यातील कमाल तापमानात चढ उतार ; रब्बीसाठी पुरेसा पाणीसाठा …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशतः ढगाळ हवामान होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची प्रतीक्षा कायम आहे. आज दिनांक 26 रोजी राज्याच्या अनेक भागात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कमाल तापमानात चढ-उतार सुरूच

पावसाने उघडीपी नंतर राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे बहुतांश ठिकाणी 32 अंश यापेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे उन्हाचा चटका बरोबरच उकाड्यातही वाढ झालीय. गुरुवारी दिनांक 25 सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 34 .7 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अद्यापही बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 20 अंशांच्या पुढे असून महाबळेश्वर आणि निफाड 17.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र

दरम्यान बंगालचा उपसागर मध्ये श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या किनार्‍याजवळ जोरदार वारे वाहत आहेत. अंदमान समुद्रात सोमवार पर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

रब्बीसाठी पुरेसा जलसाठा
दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये राज्यात झालेल्या पावसाचा फायदा हा रब्बी पिकांना चांगला होणार आहे. मागील काही दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सलग दोन महिन्यांमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे जलसाठा उत्तम झालेला आहे आणि याचा उपयोग रब्बी पिकांना होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!