दूध दराच्या प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध प्रश्नावर आंदोलन पुकारल्यानंतर दुग्ध मंत्रालयाने दोन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी विविध संघटना प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. दुग्ध विकास मंत्री यांच्या दालनात ही बैठक होणार आहे.

मागील दोन वर्षापासून दूध दराचा प्रश्न सातत्याने पुढे येत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर दुधाला मागणी कमी झाल्याचं सांगत खाजगी दूध संघानी दूध दर कमी केले. यावर्षी देखील एप्रिल महिन्यात लॉक डाऊन झाल्यानंतर गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही दुध दर पाडले गेले आणि साधारणतः प्रति लिटरला मिळणारा 32 रुपये दर थेट 22 रुपयांवर आणला. दूध व्यवसाय प्रचंड अडचणीत आलेला असतानाही सरकार लक्ष देत नसल्याने किसान सभा राज्य दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती तसेच इतर शेतकरी संघटनांनी दुधाला दर वाढवून मिळावा यासाठी आंदोलन पुकारले.

मागील आठवड्यात किसान सभा, दूध उत्पादक, शेतकरी संघर्ष समिती, रयत क्रांती शेतकरी संघटनेने दूध प्रश्नावर आंदोलन केल्यानंतर दुग्ध विकास मंत्रालयाने ही बैठक बोलावली आहे. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, आमदार सदाभाऊ खोत, किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनात जाधव, दीपक भोसले, भानुदास शिंदे, पांडुरंग शिंदे, सुहास पाटील शेतकरी नेते धनंजय धुरडे उमेश देशमुख खाजगी दूध संघाचे प्रमुख दशरथ माने प्रकाश कुतवळ यांच्यासह महानंदचे व्यवस्थापकीय संचालक दुग्धविकास सचिव आयुक्त बैठकीला उपस्थित असतील.

Leave a Comment

error: Content is protected !!