बोंबला ! आता हवामान खातं म्हणतंय ‘या’ तारखेनंतरच पावसाचं आगमन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार आगमन करणाऱ्या पावसाने आता राज्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र आता मागील २ आठवड्यांपासून पाऊसच नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे आहे. तर काही ठिकाणी पेरण्या लांबल्या आहेत. त्यात भरीत भर म्हणजे हवामान खात्याचे तज्ज्ञ के. एस . होसाळीकर यांनी ८ ,९ जुलैनंतर पाऊस पुनरागमन करेल असे सांगितले आहे. ही माहिती बळीराजाची चिंता आणखीनच वाढवणारी आहे.

के एस होसाळीकर यांनी ट्विट करीत सांगितले आहे की, “गेल्या काही दिवसात राज्यात मान्सूनने ओढ दिलेली दिसताना, गडगडाटासह होणा-या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला.पण येत्या आ़ठवड्यात परत पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता. असून ८,९ जुलै नंतर परत पावसाचे पुनरागमनाची शक्यता”. असल्याचे ट्विट होसाळीकर यांनी केले आहे.

विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस

नागपूर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर आणि विदर्भातील यवतमाळ (पुसद), भंडारा, गोंदिया, बुलढाणा वादळ व वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कृषी मंत्र्यांचा पेरणीबाबत महत्वाचा सल्ला

राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जुन पर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये . असा महत्वाचा सल्ला कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे

Leave a Comment

error: Content is protected !!