साताऱ्यातही लाल मिरचीचा ठसका…! जाणून घ्या काय आहेत दर 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र मिरची पिकाबद्दल बोलायचे झाले तर सध्या बाजारात मसाल्याच्या लाल मिरचीला चांगला भाव मिळतो आहे. आता अनेक भागात लाल तिखट म्हणजेच चटणी बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु असते. ग्राहकांना थोडे जास्त पैसे मिर्चीसाठी मोजावे लागत असले तरी शेतकऱ्यांना मात्र फायदा होणार आहे  मिरची ची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नंदुरबार नंतर आता साताऱ्यातही मिरचीच्या दरात वाढ झाली आहे.

खरेतर आवक वाढली की दर कमी होणे हे बाजाराचे सूत्र आहे. मात्र मिरचीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सध्या आवकही चांगली आहे आणि दरही चांगला मिळतो आहे. यापूर्वी नंदुरबार बाजारपेठेत विक्रमी दर मिळाला होता तर आता सातारा बाजारपेठेत लवंगी मिरचीच्या दरात तब्बल 80 रुपयांची वाढ झालेली आहे. दर वाढूनही मागणी वाढत आहे हे विशेष.

सातारा बाजारपेठेत काय आहेत दर

पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी मिरचीची आवक वाढत आहे. असे असले तरी दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. शिवाय दरात वाढ होत आहे.साताऱ्यात लवंगी मिरचीच्या दरामध्ये तर 70 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे. गतवर्षी उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे यंदा मागणीत वाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे.

सातारा बाजारपेठेत
–बेडगी मिरची 320 रुपये किलो
–शंकेश्वरी मिरची- 200
–गुंटूर  मिरची- 165
–लवंगी मिरची 180 ते 200 रुपये किलो.

नंदुरबारात दर आणि आवक विक्रमीच

नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवकही आणि दरही विक्रमीच मिळत आहे. लगतच्या राज्यातील शेतकरी देखील याच बाजारपेठेत मिरची विक्रीसाठी आणत आहेत. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 1 लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. तर दरही 4 हजार क्विंटलपर्यंत मिळालेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार असला तरी मात्र, गेल्या अनेक दिवसानंतर कोणत्या तरी शेतीपिकाला चांगला दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. येथील बाजारपेठेमध्ये दर हे गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहेत. शेतकऱ्यांना येथील दराबाबत खात्री असल्यानेच आवक वाढत आहे.

शेतकरी मित्रांनी हे पण तुमच्या फायद्याचं आहे :

ऊसात घ्या ‘ही’ आंतरपिके आणि मिळावा डबल फायदा

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पाऊसाची शक्यता; पहा हवामान अंदाज काय सांगतोय..

PM Kisan चा 10 वा हप्ता येणार ‘या’ तारखेला जमा होणार

काय आहे आजचा सोयाबीन बाजारभाव? एका क्लिकवर मिळावा राज्यातल्या बाजार समितीतला दर

थंडीच्या दिवसात कसा असावा जनावरांचा आहार ? काय घ्याल काळजी

Leave a Comment

error: Content is protected !!