उच्चशिक्षण घेऊनही शेतीकडे वळलेल्या महाराष्ट्रातल्या ‘या’ शेतकऱ्याशी मोदींनी साधला संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी आजचा श्रावण सोमवारचा दिवस अतिशय शुभ जाणार आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी P M KISAN योजनेचा नववा हप्ता शतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. हा कार्यक्रम आज दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी सुरू झाला. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून तब्बल 19 हजार 500 कोटी रुपये थेट देशातील 9. 75 करोड शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या दरम्यान राज्यातील विविध प्रगतिशील शेतकऱ्यांशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रचे रत्नगिरी जिल्ह्यातील देवेंद्र झापडेकर यांच्याशी मोदींनी बातचीत केली. झापडेकर यांच्या बाबतीत असलेली विशेष बाब म्हणजे युवावा शेतकरी देवेंद्र यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला आहे. चांगले शिक्षण घेतले असताना देखील त्यांनी शेतीकडे आपला मोर्चा वळवला. याबाबत मोदींनी त्यांचे कौतुक केले.

https://www.facebook.com/hellokrushi/videos/1253699101755291/

शेतकरी देवेंद्र यांनी जैविकरीत्या आंबा पिकवण्याचा प्रक्रिया उद्योग करतात. कार्बाइड द्वारे पिकवलेल्या आंब्यापेक्षा जैविक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांना चांगली मागणी असते अशी माहिती देवेंद्र यांनी दिली आहे. शेतकरी देवेंद्र यांनी मॅंगो रीपेनिंग चेंबर तयार करून स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू केला या उद्योगातून त्यांना चांगला फायदा मिळाल्याचं त्यांनी मोदींना सांगितलं. तसेच हा उद्योग उभारण्यासाठी कर्जाची प्रक्रिया देखील चांगल्या पद्धतीने मिळत गेली अशी माहिती देवेंद्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. तसेच पुढे बोलताना मोदी म्हणाले की यापूर्वी मागील ६-७ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची स्थिती वाईट होती . आता त्या तुलनेने सोप्या पद्धतीने कर्ज मिळते. यावेळी देवेंद्र यांनी खाण्यासाठी मोदींना रत्नागिरीला येण्याची विनंती केली.

मोदी सरकार तर्फे चालवल्या जाणाऱ्या सर्वाधिक महत्तवाकांक्षी योजनेपैकी P M KISAN योजना ही आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये 2000च्या तीन हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा केले जातात. साध्याची कोरोना परिस्थिती आणि वातावरणातील बदल यामुळे शेतकऱ्यांना या योजनेच्या हप्त्याची मोठी प्रतीक्षा असते.

Leave a Comment

error: Content is protected !!