मान्सून वेशीवर ! राज्यात ‘या’ भागात पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी मान्सून दाखल होण्याची वाट पाहत आहेत. सध्या अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर मतलई वारे सुद्धा सध्या वेगाने वाहत आहेत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत आहेत. त्यामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रात बरसणार असे दिसते आहे.

राज्याच्या अनेक भागात पूर्व मोसमी पाऊस बरसत आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले. मुंबईत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. आज देखील सकाळपासून हलका पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. मात्र मान्सूनचा पाऊस मुंबईसह राज्यभरात कधी येणार याची प्रतीक्षा आता सर्वांना लागली आहे.

महाराष्ट्रातील इतर भागात देखील पाऊस झाल्याची माहिती आहे. कराड शहर आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी झालेल्या ढग फुटी सदृश्य जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरून वाहत होते. मलकापूर कराड परिसरात घरांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. एवढेच नाही तर या पावसामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांचे कराड गोटे येथील निवासस्थानी जोरदार पाऊस आल्याने त्यांच्या कार्यालयासह निवासस्थान ही जलमय झालं होतं.

वसई विरार मध्ये मंगळवारी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दुपारपासून वसई-विरारमध्ये ढगाळ वातावरण होतो संध्याकाळी सात नंतर मात्र पावसाला सुरुवात झाली. अचानक बरसलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई ठाणे पालघर या या भागात देखील पावसाच्या सरी बरसल्या वसई विरार नालासोपारा सह पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.

Leave a Comment

error: Content is protected !!