मान्सून दाखल, महाबीजकडून शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी ? रासायनिक खतांचाही तुटवडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात मान्सून हजेरी लावली आहे. याबरोबरच शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांची सध्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे मात्र मान्सून दाखल होऊन तीन दिवस होऊन गेले आहेत तरीदेखील महाबीज कडून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आलेले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे पेरणी लांबली वर जाऊ शकते तर दुसरीकडं वाशिम मध्ये देखील खतांचा तुटवडा जाणवत आहे. याबाबतची माहिती एक मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.

मान्सून दाखल झाल्याने शेतकरी पेरणीसाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत असल्याचं चित्र आहे. मात्र शेतकऱ्यांना हव्या तितक्या प्रमाणात बियाणे आणि खते मिळत नसल्याचे समोर आले आहे.यंदा मृग नक्षत्राचे आगमन होऊन तीन दिवस लोटले आहेत. तरीदेखील महाबीज कडून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर जाऊ शकते.

वाशीम जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. कृषी सेवा केंद्रांकडून खतांची मागणी शेतकरी करत असताना कृषी सेवा केंद्राकडून खते उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे. पाऊस बरसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. बी बियाणे, रासायनिक खते विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. डीएपी 10 :26: 26 या रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. सदर खत कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध नसल्याचं कृषी सेवा केंद्र संचालकांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!