महावितरणचा ग्राहकांना डबल शॉक ! आधीच लोडशेडिंग त्यात आता युनिट दरातही होणार वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महागाई आणि इंधन दरवाढीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल केले असताना आता महावितरणच्या ग्राहकांना वीज दर वाढीचा देखील सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाली असल्यामुळे लाही लाही करून सोडणाऱ्या उष्णतेपासून वाचण्यासाठी विजेचा वापर वाढला आहे. त्यात लोडशेडींमुळे नागरिकांना बहुतांशी वेळ विजेविनाच काढावा लागतो आहे. त्यात अधिक भर म्हणून की काय, आता महावितरणच्या युनिट दरातही वाढ होणार आहे.

कसा असेल युनिट दर ?
वीज पुरवठ्यामुळे आणि कोळसा दरवाढीमुळे प्रकाश नाहीतर अंधाराची चिन्ह दिसू लागली आहे. महावितरणच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे. कोळसा दरवाढीमुळे ग्राहकांना 10 ते 60 रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक युनिट मागे 10 ते 25 पैसे युनिट प्रमाणे महागणार आहे. वीज निर्मितीसाठी वापरला जाणारा कोळसा महागल्याने वाढीव खर्च इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांना 10 ते 25 पैसे प्रति युनिट प्रमाणे जास्त आकारावे लागतील.

महावितरणचा डबल शॉक
महावितरणाने लोडशेडींग चालू करून पहिलाच ग्राहकांना शॉक दिला होता. तर आता पुन्हा प्रति युनिट मागे दर वाढ केल्यामुळे दरवाढीचा देखील शॉक ग्राहकांना बसला आहे. लोडशेडिंगमुळे ग्रामीण भागातून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी दिवसभर उच्चांकी गाठलेल्या उन्हामध्ये राब राब राबतोय आणि संध्याकाळी लोडशेडींग असल्यामुळे त्याला फॅनची हवा सुद्धा नशीब होत नाही. तर असंख्य ग्रामीण भागातील कुटुंबांना अंधारातच जेवण करावे लागते. कारण ग्रामीण भागातील बहुतांश भागात लोडशेडिंगचा टाईम हा संध्याकाळी सात वाजेपासून ते रात्री 10, 11 आणि 12 वाजेपर्यंत देण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांना हा डबल झटकाच मानावा लागेल.

Leave a Comment

error: Content is protected !!