पुढील 72 तास पावसाचे ; मराठवाड्यातील जिल्हांसाठी हवामान खात्याचा अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वीस दिवसांपासून पावसाने मराठवाड्यात ओढ दिल्यानंतरखरिपातील पिके पाण्याअभावी सुकल्याचे चित्र पाहायला मिळत होते.यामुळे बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. परंतू दिलासादायकरित्या येत्या 72 तासांमध्ये मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यासंबधी मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे डॉ. के.के. डाखोरे विभागीय हवामान सुचना दिली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील १६ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद,लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवरा विजांच्या कडकडाटासहा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.१७ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. १८ ऑगस्ट रोजी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवरा विजांच्या कडकडाटासहा जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवरा विजांच्या कडकडाटासहा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!