आता तुम्हीही मातीशिवाय भाजीपाला पिकवू शकता, जाणून घ्या हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सातत्याने खालावत जाणारा मातीचा दर्जा आणि त्यामुळे होणारे रोग पाहता, गेल्या काही वर्षांत भारतात शेतीचे नवीन तंत्र समोर आले आहे. आजकाल टेरेस आणि बाल्कनी किंवा कोणतीही मर्यादित जागा वापरून फळे आणि भाज्या पिकवण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशा परिस्थितीत हायड्रोपोनिक शेती हे यासाठी योग्य तंत्र आहे. या तंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे लागवडीपासून ते पीक विकसित होईपर्यंत कुठेही मातीची गरज भासत नाही आणि इतर तंत्रांच्या तुलनेत खर्च खूपच कमी आहे.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञान काय आहे ?

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने लागवडीसाठी मातीची गरज नाही. या पद्धतीत मातीचा वापर न करता आधुनिक पद्धतीने शेती केली जाते.ही हायड्रोपोनिक शेती वाळू आणि खड्यांमध्ये फक्त पाणी किंवा पाण्याने केली जाते.त्यासाठी हवामान नियंत्रणाची गरज नाही. हायड्रोपोनिक शेतीसाठी सुमारे 15 ते 30 अंश तापमान आवश्यक आहे. यामध्ये 80 ते 85 टक्के आर्द्रता असलेल्या हवामानात यशस्वीपणे लागवड करता येते.

प्रथम या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करणे अधिक खर्चिक असते , परंतु एकदा सिस्टम पूर्णपणे स्थापित झाल्यानंतर शेती करणे सोपे जाते. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान उभारण्यासाठी प्रति एकर क्षेत्र सुमारे 50 लाख रुपये खर्च येतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या तंत्राचा वापर करून तुमच्या घराच्या छतावरही शेती करू शकता.

हायड्रोपोनिक्‍स पद्धतीने शेती करण्यासाठी ज्यादा जागेची आवश्यकता भासत नाही केवळ आपल्या आवश्‍यकतेनुसार आपल्याला सेटअप तयार करावा लागतो. आपण सुरुवातीला एक किंवा दोन प्लांटर सिस्टिम सुद्धा घेऊ शकता. किंवा मोठ्या जागेसाठी दहा ते पंधरा प्लांटर सिस्टिम सुद्धा लावू शकता. याद्वारे आपण कोबी, पालक, स्ट्रॉबेरी शिमला मिरची टमाटर तुलसी लेट्युस या सहित अन्य भाजीपाला आणि फळांचे उत्पादन घेऊ शकता.

कशी कराल शेती?

सर्व प्रथम, एक कंटेनर एका पातळीपर्यंत पाण्याने भरा. कंटेनरमध्ये मोटर ठेवा, जेणेकरून पाण्याचा प्रवाह कायम राहील. नंतर कंटेनरमध्ये पाईप अशा प्रकारे बसवा की पाण्याचा प्रवाह त्याच्या खालच्या पृष्ठभागावर राहील. 2-3 ते तीन सेंटीमीटरचे भांडे बसविण्यासाठी पाईपमध्ये छिद्र करा. नंतर त्या छिद्रांमध्ये लहान छिद्रे असलेले भांडे फिट करा. भांड्यातील पाण्यामध्ये बियाणे इकडे तिकडे हलत नाही, यासाठी ते कोळशाच्या सर्व बाजूंनी झाकून ठेवा. त्यानंतर भांड्यात नारळाच्या सालीचा भुसा टाका , नंतर त्यावर बिया सोडा. वास्तविक नारळाच्या भुसाची पूड पाणी चांगले शोषते,जे झाडांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे.

त्याच वेळी, आपण प्लांटरमध्ये मासे देखील पाळू शकता. वास्तविक, माशांमधील टाकाऊ पदार्थ वनस्पतींच्या विकासासाठी खूप उपयुक्त मानले जातात. हायड्रोपोनिक शेती हे एक विदेशी तंत्रज्ञान आहे. परदेशात ती झाडे वाढवण्यासाठी वापरली जाते,आता हळूहळू भारतात सुद्धा ही शेती पद्धती लोकप्रिय होत आहे. हायड्रोपोनिक्स शेतीचा सेटप करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कंटेनर पर्यंत आवश्यक सूर्यप्रकाश देखील पोहोचण्याची आवश्यकता आहे. अन्यथा या झाडांचा विकास होऊ शकत नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!