राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका … ब्रह्मपुरीत उच्चांकी 35 अंश सेल्सिअसची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्यानं काही ठिकाणी ऑक्टोबर हीट चा प्रभाव जाणवतो तर रात्रीच्या किमान तापमानात हळूहळू घट होत आहे. आज दिनांक 22 रोजी कोकणात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरडे तापमानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून उत्तर गुजरात पर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसंच कोमोरीन परिसरावर ही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकणात दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. गुरुवारी दिनांक 21 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी इथं उच्चांकी कमाल 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली काही ठिकाणी तापमान 33 पार गेल्यानं उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे तर अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली असल्याने पहाटे गारठा जाणवत महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी 14.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मान्सूनने 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा निरोप घेतलाय. देशाच्या उर्वरित भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान झाले आहे उद्या पर्यंत गोवा ईशान्य आणि पूर्व भारतासह देशाच्या आणखी काही भागातून मान्सून परतण्याचे संकेत आहे तर मंगळवार पर्यंत मान्सून देशाचा निरोप घेणार असून दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!