कृषी खात्यातील बदल्या लांबणीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शासनाने कृषी खात्यासह बदल्यांना राज्य शासनाच्या एका आदेशामुळे स्थगिती मिळाली आहे. मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सोमवारी जारी केलेल्या एका आदेशानुसार कोणत्याही पदावरील बदल्या करण्यास तूर्त मनाई करण्यात आली आहे. राज्यात covid-19 च्या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता 30 जून पर्यंत बदलीच्या अधिनियमानुसार कोणत्याही बदल्या करू नका सर्वसाधारण बदल्या अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणास्तव करावयाच्या बदल्या करू नयेत असं शासनाने स्पष्ट केला आहे.

कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे संकट

कोरोनाच्या संसर्गामुळे कृषी खात्यात आतापर्यंत 60 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पाचशेपेक्षा जास्त कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामुळे कर्मचारी जीव मुठीत घेऊन घाबरून कामे करीत असताना दुसऱ्या बाजूला बदल्यांच्या जोरदार हालचाली काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू होत्या. बदल्यांमध्ये आर्थिक घडामोडी होत असल्यानं काही घटकांसाठी बदल्यांचे पर्व चुकीचे वाटते मात्र करोना स्थिती विचारात घेता प्रशासकीय बदल्या लांबणीवर टाकण्याची जोरदार मागणी सर्व संघटनांकडून वारंवार केली जात होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘या’ बदल्याना सूट

– निवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरता येणार आहेत तसेच करुणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे देखील भरता येतील.
– या शिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार आल्यास सक्षम प्राधिकरण याची खात्री पटल्यास अशा कर्मचाऱ्यांची बदली करण्यास शासनाने मान्यता दिली आहे

Leave a Comment

error: Content is protected !!