अबब…! एकवेळ मांसाहार परवडला पण कोथिंबीर नको ; नागपुरात कोथिंबीर 360 रुपये किलो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनात तर भरमसाठ वाढ झालेलीच आहे पण भाजीपाल्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. कांदा, टोमॅटो यांच्या भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर झाले आहेत. नागपुरात तर कोथिंबीरचा भाव चांगलाच वाढला आहे. नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये कोथिंबीरचा २५० ते ३०० रुपये किलोचा दर सुरु आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आणि हातठेल्यांवर कोथिंबीर ३२० ते ३६० रुपये किलोने विकली जातेय. त्यामुळे कोथिंबिरीपेक्षा एकवेळ अंडी, चिकन, मासे असे मांसाहारी पदार्थ खाणे सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी अवस्था झाली आहे.

इंधन दर वाढीचा भाजीपाल्याच्या दरावर परिणाम

मुंबईत कांदे आधी ३० रुपये प्रति किलो होते ते आता ५५ रुपये किलो झाले आहेत. बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो आधी २० प्रति किलो होते ते आता थेट ८० रुपये किलो झाले आहेत.प्रत्येक भाज्यांमागे ३० ते ४० रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे. वाशी येथील एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात आवक कमी झाल्याने दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळीत दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे भाजी विक्रेते म्हणत आहेत.

पेट्रोल डिझेलचे दरही वाढले

पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर १११. १७ रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी १०२. ५२ रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर ११५. ७३ रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०५. ८४ आणि ९४. ५७ रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील सर्वांत महाग कोथिंबीर नागपुरात

राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर सध्या नागपुरात विकली जातेय. सध्या नागपूरातील किरकोळ बाजारात कोथिंबीरचा दर ३२० ते ३६० रुपये किलोंवर पोहोचलाय. लांबलेल्या पावसाने पिकांना चांगले झोडपून काढल्याने कोथिंबीर जागेवरच खराब झालीये. त्यामुळे आवक कमी झाल्याने सध्या राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपूरकरांना घ्यावी लागत आहेत. एकीकडे पेट्रोल, डिझलचे दर गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे घरगुती सिलेंडर एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहचलंय. अशात आता भाजीपाल्यानेही महागाईत भर घातलीये. नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये कोथिंबीरचा २५० ते ३०० रुपये किलोचा दर सुरु आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आणि हातठेल्यांवर कोथिंबीर ३२० ते ३६० रुपये किलोने विकली जातेय.

दर आधीचे आणि आत्ताचे

दरम्यान यापूर्वी शिमला मिरची ही ४० रुपये प्रति किलो मिळायची त्याचा दर आता ८० रुपये प्रति किलो झाला आहे. वांगी ३५ रुपये प्रतिकिलो मिळायची त्याचा दरही ८० रुपये प्रति किलो झाला आहे. तसेच गवार ४० रुपये प्रति किलो दराने मिळायची त्याचा दर आता ८० रुपये प्रति किलो झाला आहे. भेंडी ३० रुपये प्रति किलोने मिळत होती त्याचा दर ८० रुपये प्रति किलोपर्यंत गेला आहे. शिवाय कोथिंबीरही ३० रुपये प्रति किलो त्याचा दर आता ६० रुपये प्रति किलोचा आहे. हे दर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील दर आहेत.

इतर भाजीपाला दर

कांदा किमान ८०० कमाल ३६०० प्रति क्विंटल, बटाटा किमान १००० रुपये तर कमाल दर १५००रुपये, लसुन २५०० रुपये तर कमाल दर ८५०० रुपये, आले किमान दर ८०० रुपये तर कमाल दर हा २५०० रुपये प्रति क्विंटल इतका झाला आहे.

पालेभाजी दर

कोथंबीर किमान दर १५०० रुपये तर कमाल दर 2500 रुपये, मेथी किमान दर १५०० रुपये तर कमाल भाव २८००रुपये, शेपू किमान भाव ७०० तर कमाल भाव १६०० रुपये, कांदापात किमान भाव 600 तर कमाल भाव१२००, पालक किमान भाव ८०० तर कमाल भाव २००० रुपये, मुळा किमान भाव 400 तर कमाल भाव १५०० रुपये, चवळी पाला किमान भाग ४०० तर कमाल भाव 700 रुपये, करडई किमान भाव 500 तर कमाल भाव ६०० रुपये, राजगिरा कमाल भाव ६०० रुपये तर किमान भाव ४०० रुपये आहे. किमान भाव १५० रुपये तर कमाल भाव २५०, अंबाडी किमान भाव 500 रुपये तर कमाल भाव 700 रुपये आंबट चुका किमान भाव ४०० रुपये तर कमाल भाव ६०० रुपये प्रति शेकडा इतके दर भाजीपाल्यांचे आहेत. हे दर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे असून हे दिनांक 18 ऑक्टोबर 2021रोजी चे दर आहेत

Leave a Comment

error: Content is protected !!