पारा घसरला…! पुण्यात एक अंकी किमान तापमानाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आता वातावरणात गारठा जाणवायला सुरुवात झाली आहे. सकाळी धुके पडत आहे तर दिवसभर ऊन आणि कोरडी हवा वाहताना अनुभवायला मिळत आहे. राज्यातल्या बऱ्याच भागात पारा घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात देखील तापमान घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर येथे एका अंकी ९.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तामापनाची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

पुणे गारठले…

हवामान तज्ज्ञ के . एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नोंदवलेल्या आकडेवारीनुसार पुण्यातील हवेली आणि शिरूर येथे ९.७ अंश सेल्सिअस तर पुण्यातील शिवाजीनगर येथे १०.९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर हळूहळू आता रात्रीच्या वेळी जास्त थंडी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुण्यातील भोर इथं १५. ७, जुन्नर 1१८.३ ,आंबेगाव १२.९, मगरपट्टा १७.८,शिवाजीनगर १०.९, इंदापूर १३.९, खेड १८.४, वडगाव शेरी १९.३, पुरंदर १५.५ , राजगुरुनगर १२.४ , तळेगाव ११.९ ,हवेली ९.७, दौंड १२.३, निमगिरी १८.७ ,गिरीवन१८.२ आणि शिरूर ९.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद पुण्यामध्ये पाहायला मिळाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!