Onion Market Price : आज नागपुरात मिळला कांद्याला ज्यादा दर; जाणून घ्या कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 2400 रुपयांचा दर मिळाला आहे.

हा दर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Onion Market Price) इथे मिळाला असून आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 600 क्विंटल कांद्याची आवक झाली याकरिता किमान भाव 2000 कमाल भाव 2400 आणि सर्वसाधारण भाव 2325 रुपये इतका मिळाला.

तर आज सर्वाधिक उन्हाळी कांद्याची आवक ही मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक एकोणीस हजार क्विंटल इतकी झाले आहे. याकरिता किमान भाव 260 रुपये, कमाल भाव 1242 आणि सर्वसाधारण भाव १०५० रुपये इतका मिळाला आहे.

दरम्यान राज्यभरातील कांदा बाजार भावांचा विचार करता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला (Onion Market Price) सर्वाधिक भाव 2100 पर्यंत मिळत होता. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव चार वाजेपर्यंत उपलब्ध झाले नाहीत. मात्र नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूरपेक्षा जादाचा भाव आज मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

Leave a Comment

error: Content is protected !!