Onion Market Price : सोलापूर बाजार समितीत वाढला कांद्याचा कमाल दर; पहा कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज दुपारी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजारभावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 2250 रुपयांचा दर मिळाला आहे.

हा दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Onion Market Price) 11000 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 2250 आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये इतका मिळाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा कमाल भाव वाढलेला दिसून येत आहे. यापूर्वी कांद्याला कमाल भाव सोलापूर बाजार समितीमध्ये 2100 इतका मिळत होता. मात्र आजचा भाव वाढलेला (Onion Market Price) दिसून येत आहे. आज 2250 रुपयांचा कमाल भाव कांद्याला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळालाय.

कांद्याच्या आवके बद्दल बोलायचं झालं तर आज साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक 33 हजार 850 क्विंटल इतक्या सर्वाधिक कांद्याची आवक झाली आहे याकरिता किमान भाव 300 कमाल भाव 1250 आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये इतका मिळालाय.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचा कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/08/2022
कोल्हापूरक्विंटल225170017001200
औरंगाबादक्विंटल14101501350750
सोलापूरलालक्विंटल1100010022501100
धुळेलालक्विंटल5912001050800
पंढरपूरलालक्विंटल2172001500800
नागपूरलालक्विंटल200100015001375
साक्रीलालक्विंटल338503001250850
भुसावळलालक्विंटल28100010001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल8110012001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल1965001000750
नागपूरपांढराक्विंटल220100015001375
येवलाउन्हाळीक्विंटल120002501306950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल800020012361000
लासलगावउन्हाळीक्विंटल675050014511050
चांदवडउन्हाळीक्विंटल520070012601050
मनमाडउन्हाळीक्विंटल260030011501000

Leave a Comment

error: Content is protected !!