दिवाळीनंतर कांदा मार्केट सुरु, जाणून घ्या कोणत्या भागात किती मिळतोय भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या गेली 9 दिवस बंद होत्या. त्यामुळे उलाढाल ही ठप्पच होती. आता मार्केट सुरु झाल्यावर पुन्हा कांद्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेड च्या माध्यमातून 1 लाख 85 हजार मेट्रीक टन कांद्याची खरेदी केली आहे. यापैकी 1 लाख 15 हजार मेट्रीक टन कांद्याची विक्री खुल्या बाजारात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण होण्याची भिती व्यक्त होत आहे.

दिवाळीमुळे नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या 9 दिवस बंद होत्या. त्यामुळे सर्व व्यवहार हे ठप्प होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यानच्या काळात बाजार समित्या ह्या बंद असल्याने 200 ते 250 कोटींचे व्यवहार हे ठप्प होते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच 25 ते 30 कोटींचे व्यवहार हे दिवसाकाठी होत होते. आता कांद्याची आवक वाढणार असल्याचे संकेत मिळताच केंद्र सरकारने बंफर स्टॅाक मधला कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे सरकारचा निर्णय?

कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरात असलेल्या बाजारांमधील बफर स्टॉक कमी केला आहे. त्यामुळे 1.11 लाख टन कांदा आता बाजारात आला आहे. बाजारात कांद्याची आवक वाढल्यानं किलोमागे 5 ते 12 रुपयांनी दर कमी होणार आहेत. केंद्राकडे असलेला स्टॉक मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, चंदिगढ, कोच्ची आणि रायपूर यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आणला गेला आहे. याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील स्थानिक बाजारांमध्येदेखील अधिकच्या कांद्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

कांद्याला योग्य दर मिळावा म्हणून नाशिकसह सबंध राज्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. मात्र, आता कांद्याची आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि इराणहून कांदा हा मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होणार आहे. सरकारच्या या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. कांद्याला चांगला भाव देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे. त्यामुळे कांदा आयातीच्या निर्णायात बदल करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.

काय आहेत कांद्याचे दर प्रति क्विंटल (8-11-21)

अहमदनगर राहता कांदा सरासरी किंमत 3050, अहमदनगर राहुरी वांबोरी सरासरी किंमत 2500, अहमदनगर संगमनेर सरासरी किंमत 2005, अहमदनगर शेवगाव सरासरी किंमत 2000, अहमदनगर श्रीरामपूर 2400, औरंगाबाद 1500, जळगाव 2180, कोल्हापूर 2000, मुंबई 2750, नागपूर 2750, नाशिक लासलगाव विंचूर 2700, नाशिक नामपुर 2600 ,नाशिक पिंपळगाव 2800, नाशिक पिंपळगाव सायखेडा 2450, नाशिक येवला 2400, पुणे -2400, पुणे खडकी 1950, पुणे मोशी 1500, पुणे पिंपरी 2400, सांगली 2050, कराड 2000, सातारा 2500, सोलापूर मंगळवेढा 1820, सोलापूर 2200 ठाणे-कल्याण 2600

Leave a Comment

error: Content is protected !!