P M KISAN: अवघे 2 तास बाकी; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, 19 हजार 500 कोटी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी आजचा श्रावण सोमवारचा दिवस अतिशय शुभ जाणार आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी P M KISAN योजनेचा नववा हप्ता शतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. हा कार्यक्रम आज दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

9. 75 करोड शेतकऱ्यांना मिळणार लाभ

आजच्या दिवसातली विशेष गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत देशातील 9. 75 करोड शेतकरी लाभार्थ्यांना तब्बल 19 हजार 500 कोटी रुपये डायरेक्ट खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी खास असणार आहे. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुधा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.

तुम्हीही होऊ शकता सहभागी

पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील. तुम्ही pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शन द्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. हा मेसेज तुम्हाला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आहे.

या योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही ?

–पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत.
–याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
–खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.
–आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
–केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल..

Leave a Comment

error: Content is protected !!