GOOD NEWS: दूध उत्पादनात होणार वाढ ; गाई-म्हशी फक्त मादी वासरेचं जन्माला घालू शकणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आता समोर येत आहे. गायी, म्हशी फक्त मादीचं वासरं जन्माला घालू शकणारी वीर्य मात्रा उपलब्ध झाली आहे. गोकुळ दूध संघातर्फे याचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे जास्त मादी वासरे निर्माण होऊन दूध उत्पादनात वाढ व्हावी असा याचा उद्देश आहे. यासाठी शासनाने 90% मादी वासरे जन्माला येतील अशी वीर्यमात्रा उपलब्ध केल्याची माहिती गोकुळ दूध संघा तर्फे देण्यात आली आहे. याबाबतची माहिती गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनी दिली आहे.

गोकुळ दूध सरकारतर्फे उपलब्ध करण्यात येणारी वीर्यमात्रा ही केवळ 181 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. अशा वीर्यमात्रा शासनाकडूनही उपलब्ध व्हाव्यात यासाठी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी पशुसंवर्धन विभागाकडे पाठपुरावा देखील केल्याची माहिती डोंगळे यांनी दिली आहे. लिंग निश्चित वीर्य मात्रेचे बाजारातील किंमत सरासरी 1000 ते 1300 रुपयांपर्यंत आहे. मात्र आता ही वीर्यमात्रा केवळ 181 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

या वीर्यमात्रेचे फायदे

— गोठ्यामध्ये जास्त दुधाळ कालवडी तयार होतील.
— गाई किंवा म्हशी बाजारातून विकत घेण्याची गरज या तंत्रज्ञानामुळे कमी होईल.
–चांगल्या गाईची वंशावळ जास्त प्रमाणात निर्माण करता येईल.
— या तंत्रज्ञानामुळे गाई विताना आडण्याचे प्रमाण कमी होतं.
–पशुपालकाना जवळपास वर्षभर अधिक दूध देणाऱ्या गाई उपलब्ध असेल आणि पैसा मिळेल.

या वीर्यमात्राचा वापर केल्यास 90% मादी वासरे जन्माला येणार आहेत. या वीर्यमात्रा ची किंमत 181 रुपये असली तरी दूध संघ यातील शंभर रुपये घालणार आहे. त्यामुळे उत्पादकांना केवळ ही वीर्यमात्रा 81 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!