अवघे 2 तास बाकी ; 10 करोड हुन अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान चा 10 वा हप्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना ज्याची अपेक्षा होती तो दिवस अखेर आला आहे. केवळ काही तासांमध्ये मोदी सरकार कडून नव्या वर्षात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. आज म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२: ३० वाजता मोदी सरकार १० करोड शेतकऱ्यांच्या खात्यात PM KISAN चा १० वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. याच वेळी 20,000 कोटी इतकी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल. याबाबतची माहिती. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिग तोमर यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

उत्पादक संस्थांना 14 कोटी रुपयांहून अधिक इक्विटी अनुदान
तोमर यांनी दिलेल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे “व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम आणि सुमारे 351 शेतकरी उत्पादक संस्थांना 14 कोटी रुपयांहून अधिक इक्विटी अनुदान दिले जाईल” .

 

Leave a Comment

error: Content is protected !!