राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट ; चंद्रपुरात 46.4 अंश तापमानाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विविध भागात तापमानात वाढ होताना दिसत आहे. उन्हामुळे लाही लाही होत आहे. अशातच विदर्भ मराठवाड्यात आज तापमानात आणखी वाढ होणार आहे आज भारतीय हवामान खात्याकडून राज्यातील अकोला यवतमाळ वर्धा चंद्रपूर या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान काल दिनांक २९ एप्रिल रोजी पुण्यासह राज्यातील काही भागात वादळी वारे , मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.

विदर्भातील उष्णतेचा पारा सध्या 44 अंशाच्या पुढे सरकला आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार पारा असाच भडकत राहील अशी शक्यता व्यक्त होत आहे. अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग हवामान वैज्ञानिक एम. एल. साहू यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी चंद्रपूर येथे सर्वाधिक 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे राज्यातील सर्वाधिक नोंदवलं गेलेलं तापमान आहे. तर राज्यातील ब्रह्मपुरी इथं 45. ६ अंश सेल्सिअस, वर्धा 45.5 आणि नागपूर येथे 45.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. तर इतर राज्यातील विचार करता राजस्थानातील गंगानगर येथे 46. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. उत्तर प्रदेशातील झांसी इथं 46. २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर प्रयागराज इथं 46. ८अंश सेल्सिअस ची नोंद करण्यात आली आहे

उष्णतेच्या लाटेत कशी घ्याल पिकांची काळजी ?

–उभ्या पिकांना हलके व वारंवार सिंचन द्या.

— पिके जसजशी मोठी होतील किंवा वाढतील त्याप्रमाणे पाण्याची आवश्यकता असते ती पूर्ण करण्याकरिता सिंचनाची वारंवारता वाढवा

–मातीतील ओलावा राहण्यासाठी पिकांचे अवशेष किंवा पेंडा, पॉलिथिन, गवतांचे मल्चिंग म्हणून वापर करावा

— फक्त संध्याकाळी किंवा अगदी सकाळच्या वेळी कडक ऊन पडण्यापूर्वी पाणी द्यावे.

–जर आपला भाग उष्ण लाटेच्या चा प्रवरण क्षेत्रात असेल तर स्प्रिंकलर पद्धतीच्या सिंचनाचा वापर करावा.

Leave a Comment

error: Content is protected !!