राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा आगमन केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळला आहे.गुरुवारी मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याना मान्सूनच्या पावसानं झोडपून काढलं आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकणात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

पुढील आणखी पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज पुण्यासह राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आज राज्यात नंदुरबार, भांडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे चार जिल्हे वगळता, सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान वाऱ्याचा वेगही अधिक असणार आहे. राज्यात आज ताशी 30 ते 40 किमी प्रतितास इतक्या वेगानं वारे वाहणार आहे. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा आणि मोठ्या झाडाखाली उभं न राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!