पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभासाठी ‘बँक कर्ज मंजुरी पंधरवडा’ चे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राज्यात 2020- 21 पासून राबविण्यात येत आहे. ही योजना ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या आधारावर राबवली जात आहे. इच्छुक अर्जदारांचे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे व त्यास बँक कर्ज मंजुरी मिळण्यास गती देण्यासाठी कृषी विभागामार्फत तीन ते 18 जानेवारी या कालावधीमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी उपसंचालक रवींद्र पाठक यांनी दिली आहे.

आवश्यक कागदपत्रे

–वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी–

पॅन कार्ड, आधार कार्ड, पासिंग सर्टीफिकीट, राहत्या घराचे वीजबिल, बँकेचे पासबुक, मागील सहा महिन्यांची छायांकित प्रत उद्योग ज्या जागेत करणार आहे त्याचे दर पत्रक उतारा, भाडे करार पत्र, मशिनरी कोटेशन, नवीन बांधकाम करणार असल्यास सातबारा, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

— बचत गटासाठी–

बचत गट स्थापनेवेळी चा ठराव, बँक पासबुक छायांकित प्रत, सर्व सदस्यांचे आधार कार्ड ,असल्यास पॅन कार्ड, सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकारातील फोटो, कोटेशन, जागेचा भाडेकरार, उद्योग ज्या जागेत करणार आहेत त्याचे घर पत्रक उतारा, मशिनरी कोटेशन, अर्ज काढण्यासाठी गटाचा ठराव नवीन बांधकाम करणार असल्यास सातबारा बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक हे कागदपत्र आवश्यक आहेत.

या योजनेच्या वैयक्तिक लाभासाठी http://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. शेतकरी कंपनी बचत गटांसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन अर्ज सादर करावे, अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेचे उद्देश:

या योजनेचे उद्देश सूक्ष्म उद्योगांची क्षमता बांधणी करून विविध बाबींसाठी सक्षमीकरण करणे या दृष्टीने निश्चित केले आहेत.

1)सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी, उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्थांना अधिकाधिक पत मर्यादा उपलब्ध करणे.
2) उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडणे.
3)सध्या कार्यरत असलेल्या दोन लाख उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे.
4) सामायिक सेवा जसे की सामायिक प्रक्रिया सुविधा प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीचा सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.
5) संस्थांचे बळकटीकरण तसेच अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण यावर भर देणे.
6)व्यावसायिक व तांत्रिक सहाय्य याचा जास्त सूक्ष्म उद्योगांनी अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे.

किती मिळेल अनुदान ?
2021 22 या योजनेअंतर्गत भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यात 5003 वैयक्तिक उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. 264 स्वयंसहाय्यता गट 72 शेतकरी उत्पादक कंपन्या व 20 सहकारी संस्थांनाही अर्थसहाय्य देण्यात येईल. 2021- 22 या वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 215 वैयक्तिक उद्योगांना अर्थसहाय्य देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेमध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के कमाल दहा लाख अनुदान देय आहे. गट लाभार्थी जसे की स्वयंसहाय्यता गट शेतकरी उत्पादक संस्था व उत्पादक सहकारी संस्थांना सामाजिक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूक यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान देय आहे. याशिवाय इंक्युबॅशन सेंटर स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बीज भांडवल मार्केटिंग आणि ब्रँडिंग आणि प्रशिक्षण या घटकांसाठी लाभ देय आहेत.

कुठे कराल अर्ज…?
इच्छुक व्यक्ती व गटांनी स्वयंसहाय्यता गट शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थसाह्य साठी www.pmfme.mofpi.gov.in या एम आय एस पोर्टल वरती नोंदणी करून अर्ज सादर करावा सविस्तर प्रकल्प आराखडे करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा संसाधन व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठीचे सेवाशुल्क शासनामार्फत दादा करण्यात येईल तालुका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Comment

error: Content is protected !!