… अन्यथा माझ्यासह शेकडो कार्यकर्ते कृष्णा नदीमध्ये जलसमाधी घेणार ; विविध मागण्यांसाठी राजू शेट्टींचा एल्गार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकर्‍यांची पीक कर्जमाफी, सानुग्रह अनुदान, घर पडझड नुकसानभरपाई आणि दोन वर्षांपूर्वी शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेले प्रोत्साहनपर पन्नास हजारांचे अनुदान या आणि इतर मागण्यांबाबत 5 सप्टेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नृसिंहवाडी येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.पूरग्रस्तांच्या मागण्या आणि मदतीस राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी करवीर तालुक्यातील क्षेत्र प्रयाग चिखली येथील संगमावरून परिक्रमा पदयात्रेस सकाळी दहा वाजता सुरुवात झाली.

हजारो शेतकर्‍यांसह आपण जलसमाधी घेऊ

5 सप्टेंबर रोजी होणार्‍या नियोजित जलसमाधी आंदोलनापूर्वी मदत आणि मागण्यांची पूर्तता न झाल्यास हजारो शेतकर्‍यांसह आपण जलसमाधी घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी क्षेत्र प्रयाग येथे बोलताना दिला. पूरग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणखी किती संयम बाळगायचा? असा सवालही शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.

… आता जगून तरी करायचे काय?

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की , पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, शेती कर्ज माफ करावे आदी मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. त्यावर मंत्र्यांनी घोषणा केल्या. पण त्यावर आमचा विश्वास नाही. पूरग्रस्तांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर झाले पाहिजेत यासाठी हे आंदोलन केले जात आहे. नरसिंहवाडी येथे आंदोलन परिक्रमेची सांगता होणार आहे. महापुरात सर्वस्व वाहून गेले आहे. आता जगून तरी करायचे काय, असे म्हणत माझ्यासह शेकडो कार्यकर्ते कृष्णा नदीमध्ये जलसमाधी घेणार आहेत.

जुलैतील महापुराने पंचगंगा, कृष्णा खोऱ्यातील अनेक गावांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पूरग्रस्तांना पुरेशा प्रमाणात मदत देण्यात यावी, या मागणीसाठी २३ ऑगस्ट रोजी स्वभिमानीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र अद्यापही पुरेशी मदत पोहोचली नाही असा आरोप करून आज शेट्टी यांनी चिखली या तीर्थक्षेत्री त्यांनी दत्त मंदिरात अभिषेक परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. त्यांच्यासमवेत जालंदर पाटील, सावकार मादनाईक, सागर शंभूशेटे, वैभव कांबळे यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाले.

Leave a Comment

error: Content is protected !!