आमची तपश्चर्या कमी पडली असेल…! शेती आणि शेतकऱ्यांविषयी मोदींच्या भाषणातील ‘हे’ महत्वाचे मुद्दे वाचाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : आज देव दिवाळीचे प्रकाशपर्व भारतभर साजरे केले जात आहे. तसेच आज गुरुनानक यांची जयंती देखील आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची महत्वपूर्ण घोषणा आज पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी देव दिवाळी साजरी झाली असे म्हणायला हरकत नाही. तसेच आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांचे आंदोलन सार्थकी लागले…

शेती आणि शेतकऱ्यांविषयी मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

१) आम्ही ही गोष्ट शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही

शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही प्रामाणिक हेतूनं शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणले. आम्ही ही गोष्ट शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी यांनी त्यांना कृषी कायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या, बदलण्यास तयार झालो. कायदे दोन वर्ष स्थगित करण्यास तयार झालो. पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला.

२)आमची तपश्चर्या कमी पडली असेल…

देशवासियांची माफी मागून सांगतो की आमची तपश्चर्या कमी पडली असेल. दिव्याच्या प्रकाशासारखं सत्य आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. आज गुरुनानक यांचं प्रकाश पर्व आहे. आज मी कोणालाही दोष देणार नाही. येणाऱ्या संसंदेच्या अधिवेशनात आम्ही ते कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आता आम्ही हे कायदे रद्द करत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

३)आजपासून नवी सुरुवात …

मी आंदोलक शेतकऱ्यांना आवाहन करतो, की तुम्ही घरी परत जावा. शेतात जावा. आपण नवी सुरुवात करत आहोत. आपण आजपासून नवी सुरुवात करत आहोत.
— झिरो बजेट शेतीला सुरुवात करत आहोत
–पिकांची रचना बदलण्यासाठी, एमएपसी वाढवण्यासाठी एका समितीची स्थापना करत आहोत. याकमिटीत केंद्र सरकार, राज्य सरकार, कृषी अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी संघटना यांचे सदस्य सहभागी असतील.

४)कृषी क्षेत्रावरील बजेट पाचपट वाढवलं

शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले, आम्ही एमएसपी वाढवली, रेकॉर्डब्रेक खरेदी केंद्र वाढवली. देशातील एक हजाराहून अधिक बाजार समित्यांना ई-नाम शी जोडलं. यामुळं देशातील कोणत्याही ठिकाणी शेतकरी माल पाठवू लागला. आम्ही बाजार समित्यांच्या विकासावर काम केलं. कृषी क्षेत्रावरील बजेट पाचपट वाढवलं.

५)10 हजार एफएपीओ निर्माण करत आहोत

दरवर्षी सव्वालाख कोटी रुपये शेती क्षेत्रावर खर्च केले जात आहेत. गाव आणि शेतीच्या जवळपास गोदाम आणि कृषी उपकरणांचा विकास यासाठी वेगानं काम करण्यात येत आहे. छोट्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी एफपीओ वर काम सुरु आहे. 10 हजार एफएपीओ निर्माण करत आहोत.

६)शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून आमचं सरकार प्रामाणिकपणे काम करत आहोत.

शेतकरी उत्पादक कंपन्यांवर 7 हजार कोटी केला जातोय. मायक्रो इरिगेशनवर 10 हजार कोटी खर्च होतोय. पीक कर्ज 16 लाख कोटींवर नेत आहोत. मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देत आहोत. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत आहोत.शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून आमचं सरकार प्रामाणिकपणे काम करत आहोत.

७)शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 65 हजार कोटी वर्ग केले

आमच्या सरकारनं 22 कोटी सॉईल हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना दिली. या वैज्ञानिक उपक्रमामुळं उत्पन्न वाढलं. पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवली. आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना जादा निधी मिळावा म्हणून आम्ही नियम बदलले. गेल्या चार वर्षात 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. आम्ही शेतमजूर यांच्यासाठी विमा आणि पेन्शन योजना आणली. शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 65 हजार कोटी वर्ग केले.

 

Leave a Comment

error: Content is protected !!