सोयाबीन पिकावर दिसून येतोय खोडमाशीचा प्रादुर्भाव? असे करा व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्यपरिस्थितीतसोयाबीन पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे यावर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी तील शास्त्रज्ञांनी अशा परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना संदर्भात पीक स दिला ल्लाआहे .पाहुयात यासंबंधी सविस्तर माहिती .

प्रादुर्भावाची लक्षणे

खोडमाशीचा प्रादुर्भाव पीक लहान असताना सहज ओळखू येतो. सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे पंधरा ते वीस दिवसांच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असल्याची शक्यता असते. असा शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये जमिनीच्या बाजूने डोके असलेली लहान पिवळी अळी खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते.

व्यवस्थापन

–इथिआॅन ५०%- १५ मिली प्रती १० लिटर पाणी प्रमाणे प्रति एकर करीता ३०० मिली
किंवा
–थायमिथोक्झाम १२.६%+ लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५% (संयुक्त कीटकनाशक) – २.५ मिली प्रती १० लिटर पाणी प्रमाणे प्रति एकर करीता ५० मिली
किंवा
–इंडाक्झाकार्ब १५.८ टक्के ६.५ मिली प्रती १० लिटर पाणी प्रमाणे प्रति एकर करीता १३३ मिली
किंवा
–क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % – ३ मिली प्रती १० लिटर पाणी प्रमाणे प्रति एकर करीता ६० मिली फवारावे.

वरील किटकनाशके पाने खाणाऱ्या अळयांचे सुध्दा व्यवस्थापन करतात त्यामुळे त्याकरिता वेगळी फवारणी करण्याची आवश्यकता नाही
फवारणी पावसाचा अंदाज घेऊनच करावी.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००

Leave a Comment

error: Content is protected !!