पावसाअभावी पपईवर रोगांचा प्रादुर्भाव, 6 एकर बागेवर शेतकऱ्याने चालवला कोयता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र आता पावसाने चांगलीच दडी दिल्यामुळे फळबाग करणार्‍या शेतकर्‍यांवर देखील मोठे संकट उभे ठाकले आहे. नंदुरबार च्या एका शेतकऱ्यांना सहा एकर वरील पपईच्या बागेवर कोइता चालवला आहे. वासुदेव महादेव पाटील असं पपईच्या बागेवर कोयता चालवलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

नंदुरबार जिल्ह्याचा विचार करिता संपूर्ण जून महिना नंदुरबार मध्ये कोरडाठाक झाल्यामुळे फळांचे उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना एका बाजूला पिकांवर पडणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव तर दुसरीकडं पाऊस न पडण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात लागवड केलेल्या पपई बागांवर रोगाला पपईच्या बागात काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शहादा तालुक्यातील जायखेडा शिवारातील शेतकरी वासुदेव महादेव पाटील यांनी पपई पिकावर मोझाईक रोग आल्यामुळे आपल्या सहा एकर क्षेत्रातील पपई कापून फेकून दिल्या. दरवर्षी पपई पिकावर नवनवीन लोक येत असतात या रोगांवर महागडी औषधे फवारणी करून देखील त्याचा उपयोग होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे.

वासुदेव पाटील यांनी एप्रिल महिन्यात साडेपाच हजार रोपांची लागवड केली होती. रोपांना जगवण्यासाठी रासायनिक खतांबरोबर इतर खर्चही केला होता. परंतु तीन महिन्यांनंतरही पपई पिकावर मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टाकलेला पैसा परत निघताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांना संतापून पपईचे झाड कापून टाकले आहेत.नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जात असून दरवर्षी येणाऱ्या विविध रोगांवर पपई उत्पादक शेतकरी अडचणीत असतो कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या वतीने पपईवर येणाऱ्या रोगावर वेळेत संशोधन होणे गरजेचे असल्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!