शेतात भरली संसद; शेतकऱ्याने थेट मोदींशी केली “खेत की बात” मांडले महत्वाचे मुद्दे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एका शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह या सोशल मीडियाद्वारे सरळपणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत “खेत की बात” करत अगदी आदर व्यक्त करत त्यांनी आपले प्रश्न त्यांच्या पुढे व्यक्त केलेले आहेत. या शेतकऱ्याचे नाव भाऊसाहेब शेळके असून त्याने आपली फेसबुक द्वारे अनेक शेतकरी वर्गाच्या व्यथा मांडलेल्या आहेत.

याबाबत बोलताना शेतकरी भाऊसाहेब शेळके यांनी सांगितले की, मी जे मुद्दे मांडले आहेत ते मुद्धे लोक प्रतिनिधीनी संसदेत मांडले पाहिजे होते परंतु तसे होत नसल्यामुळे मी स्वतः इथे शेतामध्ये उभे राहून जे की भाऊसाहेब औतासमोर समोर उभा राहून आपली व्यथा मांडत आहेत. भाऊसाहेब यांनी आपल्या शेतातच प्रति संसद भरवत जसे लोकप्रतिनिधी संसदेमध्ये बोलतात त्याच प्रकारे त्यांनी लोकसभा अध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून शेतकरी वर्गाचे आपले प्रश्न मांडलेले आहेत. जवळ जवळ या २२ मिनिटे फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधला.

मोदींपुढे मांडले हे मुद्दे

— इंधन दरवाढ,
–शेतमालाचा कमी भाव
— कृषी कायदे रद्द करावे हा सुद्धा मुद्धा मांडलेला आहे.
— प्रधानमंत्री पीकविमा योजना शेतकरी हिताचा राहिलेला नाही.
–सहकारी कारखाने बंद होऊन शेकऱ्यांच्या मालकीचे कारखाने विकले जात आहेत.
— शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामीण भागामधील जे रस्ते आहेत ते रस्ते विकासाचे मुद्धे यासारखे प्रश्न सविस्तरपणे मांडलेले आहेत.

शेळके यांचा व्हिडीओ व्हायरल

भाऊसाहेब शेळके यांचा लाईव्ह संवाद चा व्हिडिओ ग्रामीण भागातील लोकांनी चांगलाच डोक्यावर घेतलेला आहे जे हा जो 22 मिनिटांचा जो उपक्रम झाला त्या उपक्रमाचे चांगलेच कौतुक केलेले आहे. भाऊसाहेब शेळके यांनी लाईव्ह द्वारे विचारले गेलेले प्रश्न तसेच अनेक मागण्या पाहत त्यांना चांगलाच पाठिंबा मिळत आहे तसेच व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाईक्स तसेच कॉमेंट्स आणि शेअर सुद्धा केला जात आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!