कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ अभियान, कार्यशाळेत 53 शेती गटांचा सहभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे हा प्रयत्न राज्याच्या कृषी विभागाचा आहे. त्याकरिता राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजिवनी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शेती संबंधित दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी कृषी शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शुक्रवारी आज नाशिक येथे कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ अभियानात शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची ऑनलाईन राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत 53 शेती गटांनी शेतमाल प्रदर्शनाद्वारे सहभाग घेतला. या कार्यक्रमात कृषी मंत्री दादा भुसे यांनी देखील सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हण्टले की , ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत वाणाच्या बाजारातील मागणीनुसार शेतकऱ्यांनी शेतात पिक घ्यावे जेणेकरून, उत्पन्नास योग्य हमीभाव मिळेल. त्यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक या दृष्टीने विक्री व्यवस्थापन बळकट करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून एक धोरण निश्चित केले जाईल. गतवर्षी देशभरात एकूण 58 हजार 76 कोटी शेतमालाच्या निर्यातीपैकी 13 हजार 877 कोटींची निर्यात एकट्या महाराष्ट्रातून झाली असून 24 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. आगामी काळात गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पुढे यावे. असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!