औरंगाबादेत पाझर तलाव फुटला ; नागद गावातील 30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे आणि हंगामाच्या शेवटी कोसळणारा हा पाऊस मुसळधार पद्धतीने कोसळतोय औरंगाबाद मध्ये देखील पावसाने थैमान घातले जोरदार पावसानंतर औरंगाबाद मधील दिलदारी पाझर तलाव फुटलय यानंतर नागद परिसरात भीषण पूर आला आहे. आजूबाजूचा परिसर संपूर्ण जलमय झाला आहे.

या भागात आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेल्या मंदिरात एक पुजारी अडकला होता या पुजाऱ्याला फोडून नागरिकांनी बाहेर काढण्याची माहिती मिळते आहे त्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता ना गत गावातील मंदिराचा दरवाजा बंद झाल्यानंतर गावकऱ्यांनी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन राबवत फोडून पूजाला बाहेर काढले आहे.

30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू

औरंगाबादमधील चाळीसगाव, कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झालीय. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला, तर कन्नड चाळीसगाव घाटात दरड कोसळली. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार माजलाय. ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. नागद गावातील 30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू झालाय. पुराच्या पाण्यात फसून गाई म्हशींचा मृत्यू झाला. नदीच्या काठावरील गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशींचा मृत्यू झाला. भिलदारी धरण फुटल्यामुळे नदीला जोरदार पूर आला होता. यात हे नुकसान झालं.

कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला

औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात फसल्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झालाय. अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे. यामुळे कन्नड तालुक्यातील 10-12 गावांचा संपर्क तुटलाय.

 

Leave a Comment

error: Content is protected !!