शेंगदाणा आणि मोहरी तेलाच्या किमती घटल्या; तर सोयाबीन तेलाच्या दरांत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे महागाईनं सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. तर दुसरीकडे काहीसा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. असं असलं तरी, खाद्य तेलाच्या (Edible Oil) किमतींत मात्र सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोयाबीन तेल, सीपीओ, कापूस बियाणं आणि पामोलिन तेलाच्या दरात घसरण होताना दिसत आहे. मोहरी आणि शेंगदाणा तेल-तेलबियांचे दर मात्र स्थिर आहेत.

सूत्रांनी सांगितलं की, मलेशिया एक्सचेंज सुमारे अर्धा टक्का खाली होता, तर शिकागो एक्सचेंज देखील 1.8 टक्क्यांच्या आसपास होता. परदेशातील बाजारातील घसरणीमुळे सोयाबीन तेल, कच्चं पामतेल (सीपीओ), कापूस बियाणं आणि पामोलिन तेलाच्या किमतीत घसरण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मोहरीची आवक कमी

तज्ज्ञांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोयाबीन वगळता बाजारात इतर कोणत्याही तेलबियांना मागणी नाही. याशिवाय शिकागो एक्सचेंजमधील मंदीमुळे सोयाबीन तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. बाजारातील मोहरी आणि भुईमूगाची आवक घटू लागली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. बुधवारी बाजारात मोहरीची आवक सुमारे पाच लाख पोत्यांवरून घटून साडेचार लाख पोत्यांवर आली आहे. मोहरीपासून सध्या मोठ्या प्रमाणावर रिफाईंड तेल (Edible Oil) तयार केलं जात आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत बाजारात मोहरीचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. मोहरीच्या पिकाची पुढची खेप येण्यासाठी आणखी 9 ते 10 महिने लागणार आहेत. त्यामुळे बाजारात मोहरीचा तुटवडा जाणवू नये, यासाठी सरकारनं योग्य वेळी खबरदारी घेणं गरजेचं आहे.

सरकारनं मोहरीचा साठा करावा

केंद्र तसेच राज्य सरकारच्या खरेदी संस्थांना मोहरीच्या तेलबिया खरेदी करून त्याचा साठा करून घेण्याचं आवाहन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. हे गरजेच्या वेळी देशाच्या हिताचं ठरेल. मोहरीला पर्याय नसल्यानं सरकारला सतर्क राहावं लागणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!