चित्र बदलले…! ‘या’ बाजार समितीत सोयाबीन दरात एका दिवसात 559 रुपयांची वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आठवड्याच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे आजचे बाजारभाव पाहता आजही बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीनला पुन्हा चांगला भाव मिळेल अशी आशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आहे. मागील आठवड्यात दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संयम दाखवत टप्प्याटप्प्याने सोयाबीन बाजारात आणल्यामुळे आज ही स्थिती पाहायला मिळत आहे. तसेच मागणीतही वाढ होत असल्यामुळे सोयाबीनच्या बाजारात आशादायी चित्र पहायला मिळत आहे.

आजचे बाजारातील चित्र

आज (२८) रोजी सोयाबीन बाजारातले चित्र पाहता अकोला बाजार समितीत पुन्हा भाव वधारला असून आज जास्तीत जास्त ७००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. तर चिखली बाजार समितीत ७२०० रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव मिळाला आहे. हाच आजचा सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव आहे. अकोला बाजार समितीत सोमवारी (२७) रोजी हाच बाजारभाव ६५१० इतका होता आज त्यात तब्बल ४९० रुपयांची वाढ झाली आहे. तर चिखली बाजारसमितीचा विचार करता सोमवारी हा भाव ६६४१ इतका होता . तोच आज ७२०० इतका झाला आहे ५५९ रुपयांची आज वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ही अतिशय समाधानकारक बाब आहे.

आजचे (28/12/2021 )सोयाबीन बाजारभाव

शेतमाल— जात/प्रत— परिमाण— आवक —कमीत कमी दर— जास्तीत जास्त दर— सर्वसाधारण दर

जळगाव — क्विंटल 14 6050, 6100, 6050
माजलगाव — क्विंटल 365 5000, 6299, 6100
सिल्लोड — क्विंटल 9 5800, 6300, 6000
कारंजा — क्विंटल 5000 5650, 6410, 5975
परळी-वैजनाथ — क्विंटल 650 6151, 6311, 6250
राहता — क्विंटल 74 6000, 6300, 6200
सोलापूर लोकल क्विंटल 293 4500, 6345, 6200
अमळनेर लोकल क्विंटल 150 5770, 6111, 6111
हिंगोली लोकल क्विंटल 600 5880, 6505, 6192
मेहकर लोकल क्विंटल 900 5500, 6300, 6000
मेहकर नं. १ क्विंटल 150 6000, 6600, 6200
जालना पिवळा क्विंटल 2427 5700, 6200, 6100
अकोला पिवळा क्विंटल 2638 5700, 7000, 6040
चिखली पिवळा क्विंटल 1360 6100, 7200, 6650
पैठण पिवळा क्विंटल 9 4901, 6046, 5900
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 42 6200, 6300, 6250
भोकर पिवळा क्विंटल 200 5000, 6313, 5656
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 235 5700, 6300, 6000
जिंतूर पिवळा क्विंटल 32 5300, 6251 ,5920
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 2090 5950, 6425, 6255
मलकापूर पिवळा क्विंटल 246 4800 ,6195, 5630
शेवगाव पिवळा क्विंटल 21 5000, 5200, 5200
परतूर पिवळा क्विंटल 27 6000, 6351, 6330
गंगाखेड पिवळा क्विंटल 31 6300 ,6450, 6300
तेल्हारा पिवळा क्विंटल 250 5585, 6085, 5835
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 120 5300, 6370, 6200
किल्ले धारुर पिवळा क्विंटल 77 6051, 6325, 6232
पांढरकवडा पिवळा क्विंटल 57 6100, 6345, 6250
उमरखेड पिवळा क्विंटल 120 5600 5800, 5700
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 120 5600, 5800 5700
काटोल पिवळा क्विंटल 62 4500 6000, 5300
आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 170 3600, 5855, 5000
सिंदी पिवळा क्विंटल 162 5550, 6405, 6000
देवणी पिवळा क्विंटल 99 6240, 6552, 6396

Leave a Comment

error: Content is protected !!