Pik Vima Yojana : पीक विम्याची माहिती एका फोनवर; सरकारने सुरु केलाय ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यासांठी एक रुपयात पीक विमा योजना (Pik Vima Yojana) राबविली जाते. पिकांच्या नुकसानीनंतर शेतकरी या योजनेसाठी अर्ज तर करतात. मात्र एकदा पीक विम्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जाच्या स्थितीबाबत त्यांना माहिती सांगणारे कोणीच नसते. अशा वेळी शेतकऱ्यांना डिजिटल सेवा केंद्रांवर हेलपाटे मारूनही योग्य ती माहिती मिळत नाही. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी 14447 हा टोल फ्री क्रमांक जारी करत, शेतकरी रक्षक हेल्पलाईन (Pik Vima Yojana) सुरु केली आहे.

एका कॉलवर संपूर्ण माहिती (Pik Vima Yojana Helpline Number)

केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते या हेल्पलाईनचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. त्यामुळे आता देशभरातील शेतकरी या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून, पीक विम्याबाबत (Pik Vima Yojana) आपली अडचण जाणून घेऊ शकणार आहे. 14447 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून, देशातील कोणत्याही भागातील शेतकऱ्यांना एका कॉलवर आपल्या पीक विम्याच्या दाव्याची स्थिती जाणून घेता येणार आहे. तसेच आपल्या अर्जाबाबतच्या शंकांचे निरसन शेतकऱ्यांना घरबसल्या करता येणार आहे. शेती करताना दुष्काळी स्थिती, अवकाळी पाऊस यासह अन्य बाबींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून संरक्षण दिले जाते.

हेही वाचा : पीक विम्याच्या अर्जाची स्थिती घरबसल्या समजणार; एका कॉलवर सर्व माहिती! (https://hellokrushi.com/pik-vima-yojana-status-on-one-call-crop-insurance/)

1.52 लाख कोटींचा निधी वितरित

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. सध्याच्या घडीला देशातिल कृषी क्षेत्रातील वृद्धीसाठी जिथे जिथे गरज आहे. तिथे सरकारकडून आर्थिक गुंतवणूक केली जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना ही महत्वाची योजना असल्याने, या योजनेसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उभारला जात आहे. या योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशात 15 कोटी शेतकरी पीक विमा योज़नेसोबत जोडले गेले आहे. तर देशातील एकूण शेतकऱ्यांच्या 29 हजार 237 कोटींच्या तुलनेत शेतकऱ्यांना सरकारकडून आतापर्यंत 1.52 लाख कोटींचा निधी देण्यात आला असल्याचे ही केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी हेल्पलाईनचे लॉन्चिंग करताना म्हटले आहे.

error: Content is protected !!