मृग नक्षत्राच्या सुरवातीस ‘या’ 2 पिकांची करा लागवड , कमी कष्टात मिळेल भरघोस फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्याची पेरणीच्या कामासाठी लगबग सुरु झाली आहे. यंदा पाऊस देखील समाधानकारक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आजच्या लेखात आपण मृगनक्षत्रात कमी कष्टात हमखास भरघोस फायदा मिळवून देणाऱ्या दोन पिकांची माहिती घेणार आहोत.

जमिनीची निवड आणि मशागत कशी करावी

हिवाळी पीक काढल्यानंतर आहे आणि उन्हाळी पिकानंतर जमीन नांगरणी करावी.त्यानंतर दोन तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हेक्‍टरी 25 ते 30 गाड्या कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर शेतात टाकावे मातीत मिसळून घ्यावे.जमीन पेरणीसाठी तयार करून घ्यावे.

1) सोयाबीन

सोयाबीनच्या कमी उत्पादनाला कारणीभूत गोष्टी

–आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब न करने
— सुधारित जातींच्या बियाणांचा वापर न करणे
— शेतामध्ये दर हेक्‍टरी झाडांची संख्या न राखणे
— बीड शक्तीची तपासणी न करणे आणि उगवण क्षमता न तपासणे
— योग्य खत न वापरणे तसेच त्यावर पडलेल्या कीड रोगांचा बंदोबस्त न करणे
— आंतरपीक रोपांच्या पद्धतीने वापर न करणे या देखील गोष्टी सोयाबीनच्या कमी उत्पादनाला कारणीभूत ठरतात.

सोयाबीन पिकाचे उत्पन्न करण्यासाठी

–योग्य ती जमिनीची निवड करावी असलेली सेंद्रिय खतावर येईल अश्या प्रकारे जमीन निवडावी.
–सोयाबीनची पेरणी 15 जून ते 15 जुलै च्या दरम्यान जेव्हा वाफसा असेल तेव्हा करून घ्यावी.
–प्रत्येकी 1 किलो बियाणा 2.5 ग्राम कार्बेनडेसिन किंवा 5 ग्राम ट्राकोडर्मा सोडावा त्यामुळे बियांना बुरशी लागत नाही.
–जर तुम्ही सलग पेरणी करणार असाल तर 75-80 किलो प्रति हेक्टरअसे प्रमाण असावे.
–दोन्ही झाडांमधील अंतर पाच सेंटीमीटर एवढे ठेवावे.सोयाबीनचे आपण एका एकरा मागे जास्तीत जास्त 12-15 क्विंटल एवढे उत्पादन देऊ शकतो.
–हेच कमी कष्ट करून जास्त नफा मिळवता येईल त्याचबरोबर हे पीक फक्त पावसाच्या जीवावर येते.

२) मूग

–मुग हेदेखील मृग नक्षत्राच्या सुरुवातीस घेण्यासारखे पीक आहे.
–मूग हे शोर्ट टर्म पिक आहे.
–या पिकासाठी मध्यम व भारी जमीन चालते शक्यतो हे पीक हलक्या जमिनीमध्ये करू नये.
–क्षार युक्त जमीन टाळावी.
–एक एकरासाठी आठ किलो बियाणे घ्यावे.
–चांगले उत्पादन येण्यासाठी मुगाच्या बियांना रायकोडर्मा चोळावे.
–त्यानंतर योग्य ते कीटक नाशक मारावे जेणेकरून रोगराई होणार नाही.
— मुगाच्या शेंगा तोडायला कधीच उशीर करायचा नाही.
–जर बियांची जात BPMR 145 असेल तर 6 ते 7 क्विंटल आरामशीर उत्पन्न येते.
–बियांच्या व्हरायटी वर त्याचे उत्पन्न अवलंबून असतो.
–बाजार भावात मुगाला मोठी मागणी आहे.
— तसेच मुगाचा दर हा 6 हजार रुपये प्रति क्विंटल पासून पुढे असतो.
–दर एकरी मुगाचे 30 ते 35 हजारापर्यंत उत्पन्न मिळू शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!