कोळपणी, नांगरट, पेरणी, औषध फवारणी एकाच यंत्राद्वारे ; बनवली शेतीउपयुक्त जुगाडू भन्नाट गाडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : इस्लामपूर येथील कुमार पाटील या नागरिकाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव कौशल्य वापरून शेतीपूरक चारचाकी गाडी तयार केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर करत तयार केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदा आहेत मशागतीची कामे या चारचाकी गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने आलेल्या गाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी झाली. तेव्हा कुमार पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. इस्लामपूर-पेठ रस्त्यावर विष्णुनगर येथे कुमार पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.

गेली वीस वर्षे च्या माध्यमातून शेतक-यांना छोटी-छोटी सायकल कोपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देत आहेत, हे असतानाच शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का? याचा विचार त्यांनी केला. एक वर्षांपूर्वी त्यांना चारचाकी गाडीची कल्पना सुचली. चारचाकी गाडीसाठी लोखंडी साहित्य वापरताना दुचाकीचे इंजिन वापरण्याचे ठरले १०० सी सी इंजिन घेत त्यापासून चारचाकीची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment

error: Content is protected !!