PM KISAN : चा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योज़ना म्हणजे पंतप्रधान सन्मान निधी योजना . या योजनेद्वारे सरकार कडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांची रक्कम थेट वर्ग केली जाते. दरम्यान या योज़नेचा १० वा हप्ता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. हा हप्ता आज म्हणजेच १५ डिसेम्बर ला खात्यात वर्ग केला जाणार अशी माहिती होती. मात्र आता ही तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते १० वा हप्ता उद्या म्हणजेच १६ डिसेम्बर ला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो.

नैसर्गिक शेती संमेलन

उद्या १६ डिसेम्बर ला गुजरात येथील आनंद येथे मोठे नैसर्गिक शेती संमेलन आयोजित केले गेले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना सम्बोधीत करणार आहेत. तसेच देशातील शेतकऱ्यांनी देखील टीव्ही आणि कृषी कन्द्रांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहन केले आहे. याच कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री पी एम किसानचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे.

झिरो-बजेट, नैसर्गिक शेतीवर मार्गदशन
झिरो-बजेट नैसर्गिक शेती ही एक अशी शेती पद्धत आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना कीटकनाशके आणि खतांसारख्या कृषी रसायनांऐवजी नैसर्गिक निविष्ठांवर अवलंबून राहून इनपुट खर्च कमी करणे हा आहे. पिकांना प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असलेले ९८ टक्के पोषक तत्वे – कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, पाणी आणि सौरऊर्जा – आधीच निसर्गाकडून मोफत उपलब्ध आहेत या कल्पनेवर शेतीचे तंत्र आधारित आहे. उर्वरित 1.5-2 टक्के पोषकद्रव्ये माती पुरवू शकते. महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते सुभाष पालेकर यांनी शून्य-बजेट नैसर्गिक शेतीची संकल्पना मांडली हे लक्षात घेऊन झिरो बजेट शेतीमुळे पाण्याची बचत होते . चांगले उत्पादन मिळते आणि प्रदूषणही होत नाही.

पीएम किसान लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य
मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना 2021 मध्ये मोठा बदल केला आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यासच त्यांना पुढील हप्ता मिळेल. त्याशिवाय त्यांचा हप्ता येणार नाही.सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केले आहे.

पीएम किसानचा शेतकऱ्यांसाठी संदेश
पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य असल्याचे सरकारी पोर्टलचे म्हणणे आहे. त्यात सांगितले आहे की आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी फार्मर कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा असे सांगण्यात आले आहे.

ई-केवायसी कसे भरावे
— PM KISAN च्या अधिकृत संकेतस्थळावर जा https://www.pmkisan.gov.in/
–उजव्या बाजूला तुम्हाला eKYC लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.
–आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा
–यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका
–जर दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर eKYC पूर्ण होईल अन्यथा नाही.
–ई-केवायसी ऑफलाइन भरण्यासाठी तुम्ही आधार सेवा केंद्राचीही मदत घेऊ शकता.

 

Leave a Comment

error: Content is protected !!