PM किसान: 2 कोटी शेतकऱ्यांना 1 जानेवारीला 10 वा हप्ता मिळणार नाही; अद्ययावत लाभार्थी यादी तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या करोडो शेतकऱ्यांसाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. चांगली बातमी अशी आहे की ई-केवायसी पूर्ण झाले नसले तरीही 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. वाईट बातमी म्हणजे 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना यावेळी 10 वा हप्ता मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी रोजी पीएम किसानचा पुढचा हप्ता जारी करून शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष खास बनवणार आहेत.

पैसे जमा होण्यास काही अवधी असतनाच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र हे पैसे जमा होणार नाहीत. याच्या मागचे नेमके कारण काय ? असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल पण ही प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. आयकर भरणाऱ्यांसाठी ह्या योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र, अशा लाखो लोकांनी अर्ज केला होता. अशा लोकांची ओळख आता आधार कार्डद्वारे झाली. आता त्यांच्याकडून पैसे परत घेतले जात आहेत. सर्वात जास्त म्हणजे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आहे. बेकायदेशीरपणे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी 56 टक्के लोक आयकर भरणारे आहेत.

कुणाला मिळणार नाही या योजनेचा लाभ ?
–घटनात्मक पदावर असणाऱ्या किंवा यापूर्वी पदावर राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.
— तसेच विद्यमान किंवा माजी मंत्री, महापौर किंवा पंचायत समिती सभापती, आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार तसेच शासकीय नौकरदार भले त्यांना शेती असली तरी योजनेचा लाभ मिळणार नाही.
–गेल्या आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.
–10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन असलेल्या शेतकऱ्यांनाही फायदा होणार नाही व्यावसायिक, डॉक्टर, अभियंते, सीए, वकील आणि आर्किटेक्ट या योजनेतून वगळण्यात आले आहे.

लाभार्थी यादीत नाव तपासा

–पीएम किसान वेबसाइटवर जा https://www.pmkisan.gov.in/

–उजव्या बाजूला शेतकरी कोपऱ्याखाली, लाभार्थी यादीवर क्लिक करा

–आता राज्य, जिल्हा, ब्लॉक, गाव यांसारखे तपशील भरा

–यादी मिळविण्यासाठी तपशील सबमिट करा

Leave a Comment

error: Content is protected !!