PM KISAN : पीएम किसान योजनेअंतर्गत 4,000 रुपये मिळवण्यासाठी 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज करा; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्ही शेतकरी असाल आणि पीएम किसानचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळतील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 वर्षांपूर्वी भारतातील शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाची मदत देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान ही योजना शेतकरी वर्गासाठी खूप उपयुक्त ठरली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल पण पीएम किसान योजनेसाठी अद्याप नोंदणी केली नसेल तर दुप्पट पैसे घेण्यासाठी तयार राहा. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. नोंदणीनंतर, जर तुमचा अर्ज मुदतीच्या आत स्वीकारला गेला तर तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत तुमच्या बँक खात्यात 2000 रुपये मिळतील. शिवाय, तुम्हाला डिसेंबरमध्ये 2000 रुपयांचा दुसरा हप्ता मिळेल. याचा अर्थ एकूण रु. 4000 तुमच्या खात्यात येतील.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम वाढवण्याची मोदी सरकारची योजना असल्याचेही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांऐवजी तीन हप्त्यांमध्ये 12,000 रुपये मिळतील.

हे आहेत महत्वाचे संपर्क क्रमांक

<< पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266

<< पीएम किसान हेल्पलाइन नंबर:155261

<< पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401

<< पीएम किसान ची नवी हेल्पलाइन: 011-24300606

<< पीएम किसान ची आणखी एक हेल्पलाइन : 0120-6025109

<< ई-मेल आयडी : [email protected]

या योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही ?

–पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत.
–याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
–खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.
–आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
–केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल..

.

Leave a Comment

error: Content is protected !!