PM KISAN मोठी बातमी: ‘ई-केवायसी’ पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना दहावा हप्ता मिळणार नाही; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकार पीएम किसान योजनेचा 10वा हप्ता वितरित करण्यास तयार आहे. 15 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करतील.25 डिसेंबरपूर्वी सरकार 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची काही प्रलंबित शेतीची कामे पूर्ण करता येणार आहेत. गहू आणि मोहरीच्या पेरणीनंतर देशातील बहुतांश शेतकरी 2 हजार रुपयांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मार्च 2022 पर्यंत मोदी सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत 22,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जारी करेल.

मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना 2021 मध्ये मोठा बदल केला आहे.शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यावरच त्यांना पुढील हप्ता मिळेल. त्याशिवाय तुमचा हप्ता येणार नाही. सरकारने या योजनेत ते बंधनकारक केले आहे.

सरकारने शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केले आहे
सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केले आहे.पोर्टलवर आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी फार्मर्स कॉर्नर येथे eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरद्वारेही हे करू शकता.

ई-केवायसी कसे भरावे
— PM KISAN च्या अधिकृत संकेतस्थळावर जा https://www.pmkisan.gov.in/
–उजव्या बाजूला तुम्हाला eKYC लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.
–आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा
–यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका
–जर दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर eKYC पूर्ण होईल अन्यथा नाही.

ई-केवायसी ऑफलाइन भरण्यासाठी तुम्ही आधार सेवा केंद्राचीही मदत घेऊ शकता.

Click to complete e-KYC

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!