PM Kisan: मोदी सरकारने पाठवलेला 2000 चा हप्ता मिळाला नाही ? इथे संपर्क करा आणि नोंदवा तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ PM Kisan योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील  9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली.  ही रक्कम हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र जर तुमच्या खात्यात योजनेचा आठवा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही कुठे तक्रार करू शकता याची माहिती आज आणून घेणार आहोत.

पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे तुमच्या खात्यात जमा झाला नसेल तर तुम्ही या योजनेसंदर्भात तक्रार करण्यासाठी लेखापाल किंवा कृषी विभागाशी संपर्क करू शकता आणि त्यांना सविस्तर माहिती देऊ शकता.  तिथं तुमचं काम न झाल्यास या योजनेकरिता सरकारने काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.  त्यावर देखील तुम्ही संपर्क करू शकता आणि तक्रार करू शकता.

या क्रमांकावर साधा संपर्क 

— पंतप्रधान किसान सन्मान योजना लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401

— पंतप्रधान किसान सन्मान योजना टोल फ्री क्रमांक: 18001155266

–पंतप्रधान किसान योजना हेल्पलाईन क्रमांक: 155261, 0120-6025109

–याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) [email protected] यावर देखील संपर्क करू शकता.

पी एम किसान ऑनलाइन यादीमध्ये नाव कसे तपासाल

1)यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर भेट दिली पाहिजे.

2)त्यानंतर तुम्हाला होम पेजवर फार्मर कॉर्नर वर क्लिक करावे लागेल.

3)यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

4)लाभार्थी यादीवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.

5)यावर आपण आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव माहिती प्रविष्ट कराल.

6) यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा.

7)संपूर्ण यादी आपल्या समोर येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!