PM KISAN : eKYC ची ‘ही’ सेवा तात्पुरती स्थगित ; त्याशिवाय मिळेल का योजनेचा 11 वा हप्ता ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अंत्यंत महत्वकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना होय. आतापर्यंत देशातील करोडो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा १० हप्ता जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. आता शेतकऱ्यांना आशा आहे ती पीएम किसान योज़नेच्या ११ व्या हप्त्याची. हा हप्ता एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. अशातच योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई -केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसी अपडेट करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम करण्यात आली होती. मात्र आता ही तारीख वाढवून ३१ मे हीअंतिम तारीख करण्यात आली आहे. मात्र अधिकृत वेबसाईटवर ई केवायसी करण्याचा पर्याय तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

OTP प्रमाणीकरणाद्वारे eKYC तात्पुरते स्थगित
पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी संदर्भात एक संदेश फ्लॅश होत आहे. “पीएम किसानच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे, असे संदेशात लिहिले आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी कृपया तुमच्या जवळच्या CSC म्हणजेच आधार सेवा केंद्रांशी संपर्क साधा. OTP प्रमाणीकरणाद्वारे आधार आधारित eKYC तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सर्व PM KISAN लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे” .अशा स्वरूपाचा संदेश वेबसाईटवर पहायला मिळतो आहे.

पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी सुरू झाल्यावर आधार सेवा केंद्रांवर लोकांची गर्दी होऊ लागली. तथापि, मोबाईल किंवा लॅपटॉपसह घरी बसून ते सहजपणे पूर्ण केले जाऊ शकते. सध्या ही सेवा बंद आहे त्यामुळे गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही ई-केवायसीशिवाय 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र वेबसाईटवर ई केवायसी ३१ मे पर्यंत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

चेक करा तुमच्या खात्याचा स्टेट्स
–सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
— तुम्हाला उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ चा पर्याय मिळेल
— ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.
–नवीन पृष्ठावर, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक यापैकी एक पर्याय निवडा. या क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
–तुम्ही निवडलेल्या पर्यायाची संख्या एंटर करा. त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.
–येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्व व्यवहाराची माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला.
–तुम्हाला येथे 11व्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील मिळेल.
— जर तुम्हाला’FTO is generated and Payment confirmation is pending’ असे लिहिलेले दिसले तर याचा अर्थ निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा हप्ता काही दिवसात तुमच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!