PM Kisan : पी एम किसान योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळली ; तपासा तुमचे स्टेट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: किसान सन्मान योजना अंतर्गत आतापर्यंत 11. 66 कोटी शेतकऱ्यांना १.१५ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी 14 मे रोजी याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजना लाभार्थ्यांच्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. पी. एम किसान योजना साठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्यामध्ये मात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता त्यांच्या कडून जी रक्कम वसूल करण्याचे काम सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून अपात्र शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये परत घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी विभागाने अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याबरोबरच नाव हटवण्याचा सुरुवात केली आहे.

कुणाला मिळणार नाही योजनेचा लाभ ?

1)नियमानुसार या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्‍याच्या नावे शेती असणे आवश्यक आहे.
2) यासह जमीन जर आजोबा किंवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.
3)या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याच्या नावे शेतीची जमीन असणे आवश्यक आहे.
4)जर कोणी आयकर विवरण भरत असेल तर ते पंतप्रधान किसान सन्मान निधीमधून वगळले जातील.
5)यामध्ये वकील, डॉक्टर, सीए इत्यादीही या योजनेच्या नाहीत.

ऑनलाइन यादीमध्ये नाव कसे तपासाल

1)यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर भेट दिली पाहिजे.
2)त्यानंतर तुम्हाला होम पेजवर फार्मर कॉर्नर वर क्लिक करावे लागेल.
3)यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4)लाभार्थी यादीवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.
5)यावर आपण आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव माहिती प्रविष्ट कराल.
6) यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा.
7)संपूर्ण यादी आपल्या समोर येईल.

या व्यतिरिक्त, अधिक माहितीसाठी आपण या क्रमांकावर कॉल देखील करू शकता

— पंतप्रधान किसान सन्मान योजना लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401

— पंतप्रधान किसान सन्मान योजना टोल फ्री क्रमांक: 18001155266

–पंतप्रधान किसान योजना हेल्पलाईन क्रमांक: 155261, 0120-6025109

Leave a Comment

error: Content is protected !!