PM KISAN : शेतकऱ्यांनो 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पी एम किसान योजनेच्या खात्याशी जोडले गेलेल्या शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच देशातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा नववा हप्ता जमा होऊ शकतो. यापूर्वी अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सरकार अशा अपात्र शेतकऱ्यांकडून दिलेली रक्कम वसूल करून घेणार आहे. आणि आता या योजनेचा नववा हप्ता केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

या तारखेला मिळणार हप्ता

देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. विशेष म्हणजे या योजनेच्या अंतर्गत अशाच अनेक शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे ज्यांच्याजवळ शेतीयोग्य योग्य जमीन आहे.गेल्या आठवड्यात असेही सांगण्यात आले होते की, 10 ऑगस्टपर्यंत पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकतो.

या योजनेत नोंदणी केली नसेल तर उशीर करू नका

जर तुम्ही अद्याप या योजनेत नोंदणी केली नसेल तर उशीर करू नका. तुम्ही या आठवड्यात नोंदणी केली, तर हे शक्य होणार आहे. पडताळणीनंतर तुम्हाला 9 व्या हप्त्याचा लाभ देखील मिळू शकेल. त्याची ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी खुली आहे. केवळ गेल्या दोन महिन्यांत 21 हजार कोटी रुपये थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर शेतीसाठी पाठवण्यात आलेत.

पीएम किसान योजनेत आपले नाव असे पहा

–सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. https://pmkisan.gov.in
–यानंतर तुम्हाला होमपेजवर Farmers Corner पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
–या कोपऱ्यात Beneficiaries List , लाभार्थी यादीचा पर्याय येईल त्यानंतर त्यावर क्लिक करा.
–आता आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक करावे लागेल आणि राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
–त्यानंतर Get Report गेट रिपोर्टवर क्लिक करा.
–आता गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल. यामध्ये आपण हे पाहू शकता की योजनेचे पैसे कोणाला मिळवू शकतात

या योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही ?

–पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत.
–याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
–खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.
–आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
–केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल..

Leave a Comment

error: Content is protected !!