PM KISAN : e-KYC बाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक आणि केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे पी एम किसान योजना. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ६००० रुपयांची रक्कम २०००रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये थेट वर्ग केली जाते. मात्र मध्यंतरी या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी घेतल्याने सरकारने याचे नियम अधिक कडक केले आहेत.

पीएम किसान योजनेच्या खात्यासाठी ई -केवायसी करणे अनिवार्य केले आहे. याची अंतिम मुदत ३१ मार्च अशी करण्यात आली होती. मात्र आता या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता इ केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत ३१ मे २०२२ करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ तर मिळणार आहे पण योजनेत नियमितता आणण्यासाठी प्रशासनाकडूनही योग्य ती यंत्रणा राबवली जाणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत ११ वा हप्ता शेतकरयांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत जवळपास ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.

पीएम किसान मध्ये eKYC कसे अपडेट करावे?

–यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा
–पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
–आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि शोध वर क्लिक करा.
–आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
–‘Get OTP’ वर क्लिक करा आणि तुमचा OTP इथे टाका.

Leave a Comment

error: Content is protected !!